कहाणी मेळघाटची ही लेखमाला 31 ऑक्टोबर 2020 पासून दर आठवड्याला दोन भाग अशा रीतीने कर्तव्यवर प्रसिद्ध झाली. त्यानंतर साधना प्रकाशनातर्फे ती पुस्तकरूपाने आली. स्टोरीटेलवर हे पुस्तक लेखक मिलिंद बोकील यांच्याच आवाजात ऑडिओबुक स्वरूपातही उपलब्ध आहे.
मेळघाटाच्या नागरिकांनी कायद्याच्या, ‘खोज’ सारख्या संस्थांच्या आणि स्वतःच्या जिद्द आणि कष्टाच्या जीवावर आर्थिक, सांस्कृतिक प्रगती कशी साधली याची गोष्ट या पुस्तकात आहे. महाराष्ट्रात आदिवासींच्या वस्तींमध्ये मेळघाट महत्त्वाचा आहे. तिथे बहुतकरून कोरकू समाज राहतो. सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत मेळघाट पिछाडीवर होता. 2006 मध्ये वनाधिकार कायदा आला. मेळघाटमध्ये त्याची अंमलबजावणी तशी उशीराच म्हणजे 2012 साली सुरू झाली. जंगल व्यवस्थापन, वन हक्क, ग्रामसभा आणि मेळघाटमधील स्त्री-पुरुषांनी केलेले कष्ट, लढवलेल्या कल्पना आणि त्यातून मेळघाटाने चालवलेला स्वराज्याचा शोध यामध्ये आहे.
पुस्तकातील हे दहा मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. नऊ तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.
साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
मेळघाट - शोध स्वराज्याचा ही लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: आदिवासी ऑडीओ ऑडिओ वाचन मिलिंद बोकील लेखमाला Load More Tags
Add Comment