• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • ‘त्या’ बंदुकीच्या गोळ्यांपासून दागिने बनवतात
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    सामाजिक लेख

    ‘त्या’ बंदुकीच्या गोळ्यांपासून दागिने बनवतात

    अफगाणिस्तानातल्या एका सामाजिक कार्यकर्तीची कहाणी

    • आ. श्री. केतकर
    • 04 Oct 2022
    • 2 comments

    निश्चित पत्ता सांगता येणार नाही, अशा एका अपार्टमेंटमधील एका दारासमोर पादत्राणांचा खच पडलेला दिसतो. विशेष म्हणजे, ती पादत्राणे महिलांची असतात. अफगाणिस्तानात घराबाहेर महिला नेहमी सावलीसारख्याच असतात. पण घरामध्ये आतील खोल्यांत मात्र त्याच महिला, मुक्तपणे आनंददायी असे रंगीबेरंगी कपडे परिधान करून, अगदी मोकळेपणाने आपसात गप्पागोष्टी करत असतात. कुजबुजत छान हास्यविनोद करतानाही दिसतात. त्यामुळे त्या साऱ्या खोल्या जिवंत भासतात, अगदी गजबजल्याप्रमाणे. बाहेरच्या तणावपूर्ण वातावरणाच्या अगदी विरुद्ध असे हे चित्र. त्या महिलांमधूनच लैला हैदरी ही झपाटलेल्या माणसारखी, झंझावात वाटावा अशा प्रकारे, इकडून तिकडे ये-जा करत असते.

    खडतर परिस्थितीतही माणसाची बुद्धी शाबूत असेल, तर तो त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न नक्कीच करतो. अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा ताबा मिळवला, त्यालाही आता वर्ष उलटून गेले आहे. तालिबान्यांनी वरवर आपण बदललो आहोत असे कितीही सांगितले, तरी त्यांच्या वागणुकीमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. म्हणजे महिलांवर कडक निर्बंध पुन्हा एकदा लादले गेले आहेत. त्यांना मोकळेपणाने कुठेही जाता येत नाही, मनाप्रमाणे कपडे वा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करता येत नाही आणि शिक्षणाचा विचारही करता येत नाही. त्या कायम दहशतीखालीच वावरतात, नव्हे, तसे त्यांना वावरावेच लागते. कारण तसे केले नाही, तर परिणाम काय होतील याचा अंदाज करायलाही त्या घाबरतात. पण असे निर्बंध असले तरीही त्याला लोक किती काळ घाबरतात हा प्रश्न आहेच. कारण कालांतराने लोक त्याला सरावतात व हळूहळू, दबकत दबकत का होईना, पूर्वीप्रमाणे वावरू लागतात, हा आजवरचा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. काही काळानंतर लोकांच्यात थोडा धीटपणा येतो आणि त्याची लागण इतरांनाही होते. मग तो वाढत जातो आणि ते धोका पत्करायलाही तयार होतात. कारण प्रत्येक माणसाला अगदी मोकळेपणाने वावरायची इच्छा तसेच सवय असते. त्याच्या वागणुकीवरील बंधने त्याला फार काळ दबवून ठेवू शकत नाहीत.

    अफगाणिस्तानातील महिलांनी मधला काही वर्षांचा काळ खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळेच पुन्हा धर्माच्या नावाखाली तालिबानद्वारा घालण्यात आलेले कडक निर्बंध त्यांना नकोसे वाटू लागले आहेत. पण त्यातून सुटका कशी करून घ्यायची, याबाबत मात्र त्यांच्यात संभ्रम आहे. पण काही चतुर महिला त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच वृत्तांत लंडनच्या ‘द टाइम्स’मध्ये आला आहे. वाचकांसाठी तो (स्वैर अनुवाद रूपात) देत आहे.

    काबुल : निश्चित पत्ता सांगता येणार नाही, अशा एका अपार्टमेंटमधील एका दारासमोर पादत्राणांचा खच पडलेला दिसतो. विशेष म्हणजे, ती पादत्राणे महिलांची असतात. अफगाणिस्तानात घराबाहेर महिला नेहमी सावलीसारख्याच असतात. पण घरामध्ये आतील खोल्यांत मात्र त्याच महिला, मुक्तपणे आनंददायी असे रंगीबेरंगी कपडे परिधान करून, अगदी मोकळेपणाने आपसात गप्पागोष्टी करत असतात. कुजबुजत छान हास्यविनोद करतानाही दिसतात. त्यामुळे त्या साऱ्या खोल्या जिवंत भासतात, अगदी गजबजल्याप्रमाणे. बाहेरच्या तणावपूर्ण वातावरणाच्या अगदी विरुद्ध असे हे चित्र. त्या महिलांमधूनच लैला हैदरी ही झपाटलेल्या माणसारखी, झंझावात वाटावा अशा प्रकारे, इकडून तिकडे ये-जा करत असते. तिच्या हातात सिगरेट असते आणि तिची नखे चकाकणाऱ्या हिरव्या रंगाने रंगवलेली असतात.

    त्या खोल्यांतील एका खोलीत काही महिला कपडे शिवायला शिकत असतात, तर दुसरीकडे काहीजणी तयार कपड्यांवर भरतकाम करण्यात दंग असतात. पलीकडे तिसऱ्या खोलीत मात्र काही महिला कठीण काम करत असतात. तेथून मोठे आवाज येत असतात. तेथे काही जणी पितळी वस्तूंवर हातोडीने प्रहार करून त्यांना आकार देत असतात, तर बाजूलाच काहीजणी पक्कड आणि झाळणी (ब्लो-टॉर्च) च्या सहाय्याने त्या पितळी तुकड्यांना दागिन्यांचा म्हणजे कानातल्या रिंग किंवा डूल इ. तसेच गळ्यातील साखळीतील पदक किवा झुबका अशा वस्तूंचा आकार देण्यात गर्क झालेल्या दिसतात.

    टेबलक्लॉथवर आपल्या हातातल्या पिशवीतील बंदुकीच्या गोळ्या ओततच लैला हसतमुखानं मधुर आवाजात जणू कूजन करते. “बघा तरी आम्ही काय वापरतोय. ही माणसं एकमेकांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारत आहेत पण आम्ही बायका मात्र त्यांच्यातून कलेची निर्मिती करत आहोत.” तिच्या बोलण्यात थोडाही तणाव किंवा भीती दिसत नाही. ती अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असते. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तालिबानने जोरदार हल्ला करून अफगाण फौजांना प्रतिकारही करू न देता, अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर येथे जे काही मोजके (तालिबानविरुद्धच्या) चळवळीतील लोक राहत आहेत, त्यांच्यापैकीच 43 वर्षांची लैला हैदरी ही एक आहे. आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची दीर्घकाळची सवय तिला आहे. त्यामुळेच ती सिगरेट ओढते, स्वतःची मोटार स्वतः चालवते. अफगाण मुली आणि महिलांच्या आशा, तालिबानच्या पुरुष आणि महिलांच्यात भेदभाव करणाऱ्या अमलातही जिवंत ठेवायच्या आहेत. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ती करते.

    ही बंडखोर वृत्ती लैला हैदरीमध्ये दीर्घकाळ रुजली आहे. लहानपणीच तिचे लग्न करून देण्यात आले होते. तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती. इराणमध्ये मुल्ला असलेला एकजण तिचा पती होता. इराणमध्येच तिचा विवाह पार पडला होता. तिचा पती तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. आणि वर्षभरातच केवळ तेराव्या वर्षीच ती माताही बनली. अठरावे वर्ष संपेपर्यंत ती तीन अपत्यांची माता बनली होती. लैला सांगते, “खरं तर मी स्वतः त्यावेळी (लग्न झाले त्यावेळी) लहान मुलगीच होते. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री मी कौमार्य गमावले, आणि त्यानंतर तर तो रोज रात्री माझ्यावर बलात्कार करत असे. माझ्यासाठी ते अगदी भयानक वाईट, काळेमिट्ट दिवस होते."

    धार्मिक शिक्षण घेण्याकरता तिचा नवरा तिला बाहेर पाठवत असे. पण त्यावेळी त्या शिक्षणवर्गाकडे न जाता, तिने इतर गोष्टी शिकून घेतल्या आणि नंतर इराणमध्ये चित्रपट कशा प्रकारे निर्माण केले जातात याचाही बारकाईने अभ्यास केला... आणि चित्रपट निर्मितीची पदवीदेखील संपादन केली. अखेरीस त्यांचा घटस्फोट झाला, (इस्लामी कायद्यानुसार मुलांचा ताबा वडलांकडे गेला.) आणि 2010 मध्ये ती परत अफगाणिस्तानमध्ये काबुलला परत आली. आल्यानंतर तिने काबुलमध्ये प्रथमच महिलांनी चालवलेले उपाहारगृह रेस्टॉरंट सुरू केले. त्या उपाहारगृहाचे नावही अगदी बोलके होते. ‘ताज बेगम’ म्हणजे महिलांचा मुकुट, मानबिंदू. अविवाहित तरुण-तरुणी जिथे एकत्र खाऊ-पिऊ शकतील भोजन करू शकतील, असे ते काबुलमध्ये दुर्मिळ असलेले ठिकाण होते. पण इतरत्र होते तसेच तेथेही झाले. ती वेश्यागृह चालवत असल्याचे आरोपही तिच्यावर करण्यात येऊ लागले. पण नावे ठेवणाऱ्या लोकांना दाद न देता तिने आपले काम सुरूच ठेवले.

    या व्यवसायातून मिळणाऱ्या फायद्याची रक्कम तिनेच स्थापन केलेल्या, काबुलमधीलच ‘मदर्स कॅम्प’ या व्यसनमुक्ती केंद्राकडे पाठवण्यात येते. ती सांगते की, काबुलला परतल्यानंतर एकदा तिने आपल्या मोठ्या भावाला पाहिले. त्याला हेरॉइनचे व्यसन जडले आहे आणि तो दैन्यावस्थेत एका पुलाखाली राहत आहे, असे तिला दिसले. त्याच्यासारख्याच अनेक व्यसनाधीन लोकांबरोबर तो तेथे राहत होता. त्यावेळी तिच्या डोक्यात अशा दुर्दैवी लोकांची व्यसनापासून सुटका व्हावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची कल्पना आली आणि ताबडतोब तिने ती अमलात आणली आणि ‘मदर्स कॅम्प’ची स्थापना केली. शेकडो जणांची या व्यसनमुक्ती केंद्रामुळे व्यसनापासून पूर्ण सुटका झाली. ते सारेजण पुन्हा माणसांत आले. त्यांच्यापैकी काही जणांना तर लैलाने आपल्याच उपाहारगृहामध्ये कामालाही ठेवले. पण तिच्या या चांगल्या कामामुळे अमली पदार्थांचे व्यापारी मात्र चांगलेच खवळले. ते तिला वारंवार, अगदी नियमितपणे, धमक्या देऊ लागले. (असा अनुभव तर सर्वत्रच येत असतो. अमली पदार्थांचे व्यापारी काय किंवा वाळू माफिया काय, त्यांची ही रीतच आहे) आणि ती त्या धमक्यांना दाद देत नाही, असे पाहिल्यावर तिला ठार मारण्यासाठी त्यांनी तिच्या घरी, अगदी तिच्या झोपण्याच्या खोलीपर्यंत काही मारेकरी पोहोचले होते. त्यामुळे ती नेहमीच उशीखाली पिस्तूल ठेवत असे. पण गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तेव्हा तिचे व्यसनमुक्ती केंद्र आणि उपाहारगृह दोन्ही बंद पडले. नव्हे, नाइलाजाने ते बंद करणे तिला भाग पडले.

    लैला सांगते, “अमेरिकनांनी मला भेटून सांगितले होते की, आमच्याकडे तुला विमानतळापर्यंत नेण्यासाठी लष्करी वाहन आहे. त्यामुळे आम्ही तुला येथून, अफगाणिस्तानमधून, नक्कीच सुखरूप बाहेर काढू.” पण त्यावेळी माझे कर्मचारी आणि मित्र, सखेसोबती म्हणाले की, लैला, तूच जर आपल्या देशाबाहेर गेलीस, तर आमचे काय होईल? तेव्हा मी विचार केला की, माझ्यासारख्या महिला ठामपणे विरोधात उभ्या राहिल्या नाहीत तर आम्हा सगळ्यांना पुन्हा भूतकाळात नेऊ पाहणाऱ्या या लोकांना कोण थोपवील? त्यामुळं मी इथंच राहण्याचा निर्णय घेतला.” 

    लैला पुढे सांगते, “तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतरचे सुरुवातीचे काही महिने अगदी वाईट, दुःखदायक होते. मला तर तेव्हा आपण एखाद्या उंच इमारतीवरून खाली पडल्यासारखं वाटत होतं. जणूकाही मी अगदी मोडून पडले होते.” त्या काळात सुरुवातीला ती लपून राहत होती. पण मग तालिबान काही येथून निघून जात नाहीत हे पाहिल्यानंतर तिने आपणच आता काहीतरी करायचे असा निश्चय केला. ती म्हणते, “मी एकटीच घरात कशी राहू शकणार होते? तुम्हाला कसलीच आशा नसेल, तर ती तुम्हीच निर्माण केली पाहिजे.” आधीच्या काळात मिळवलेल्या पैशांतील काही तिने जपून ठेवले होते. त्या पैशांचा उपयोग करून तिने महिलांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आता विविध ठिकाणी त्यात 350 महिला विविध गोष्टींचे प्रशिक्षण घेत आहेत. शिवाय गुप्तपणे तिने संगणकसंबंधी शिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. तसेच आता इतर गोष्टींबरोबर इंग्लिश आणि चित्रकलेचे शिक्षणही या केंद्रांमध्ये दिले जाते. भविष्याबाबत बोलताना ती म्हणते, “आमच्याकडे दोन पर्याय आहेत. मुलींना किती दिवस शाळांमध्ये बंदी आहे, म्हणजे त्यांच्या शाळा किती दिवस बंद राहणार आहेत, हे मोजत राहायचे किंवा त्यांना आम्हीच शिक्षण द्यायचे.” यातला दुसरा पर्याय तिने निवडला आहे.

    तिच्या या शिक्षणवर्गांना तिच्याच ‘हजरा’ या अल्पसंख्याक जमातीचे लोक येतात. तालिबानी त्यांना, आणि कथित इस्लामिक स्टेटला लक्ष्य करीत आहेत. प्रशिक्षण केंद्रातील अनेक महिला या त्यांच्या कुटुंबातील कर्त्या मिळवत्या बनल्या आहेत. कारण एक तर त्यांच्या पतीचे निधन झाले आहे किंवा ते बेकार आहेत. मार्झिआ नावाची 20 वर्षीय तरुणी येथे दागिने बनवण्याचे काम करते. ती म्हणते की, “अर्थातच मला भीती वाटते की, तालिबानी येथे येतील किंवा आम्ही येथे येत असताना आम्हाला अडवतील.” आंतरराष्ट्रीय फौजा येथे असतानाच्या 20 वर्षांत तिच्या देशात झालेले चांगले बदल लैला हैदरीने पाहिले आहेत. पण आता मात्र अनेक अफगाणी महिलांना जणू वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे वाटत आहे, असे ती म्हणते.

    लैला हैदरीबाबत आणखी थोडे. शांतता  बोलण्यांमध्ये अफगाण सरकारने महिलांना सामील न केल्याबद्दल ती रागाने बोलते. 2019 मध्ये तिला ऑस्लो फ्रीडम फोरममध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले. हा कार्यक्रम ह्यूमन राइट्स फौंडेशनने (मानवी हक्क प्रतिष्ठानने) आयोजित केला होता. ‘लैला अ‍ॅट द ब्रिज’ या माहितीपटाचा विषयच लैला हैदरी आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन एलिझाबेथ आणि गुलिस्तान मिरझाई यांनी केले आहे. या माहितीपटाला संशोधनपर माहितीपट म्हणून कोपनहेगन येथील सीपीएच : डॉक्स (CPH: DPX) चित्रपट महोत्सवात 2018 मध्ये फॅक्ट (FACT) पारितोषक तसेच सांता बार्बरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सामाजिक न्याय पारितोषक (सोशल जस्टिस प्राइझ) देण्यात आले होते.

    तात्पर्य सांगायचे तर, काळ कितीही खडतर असला, तरीही माणसाने धीर धरून प्रयत्न केले तर यश मिळते!

    - आ. श्री. केतकर
    aashriketkar@gmail.com 
    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


    ‘लैला अ‍ॅट द ब्रिज’ चा ट्रेलर

     

    Tags: अफगाणिस्तान अफगाण आ. श्री. केतकर तालिबान दहशतवादी Laila Haidari Taliban Afganistan Load More Tags

    Comments:

    Anup Priolkar

    Excellent article. Very much informative. Thanks

    Oct 10, 2022

    Ashwini barve

    लेख छान आहे. अफगाणिस्तानात अशा लपुनछपून किती महिला काम करतात,परिस्थितीला धैर्याने तोंड देतात. ब्लो टॉर्चला ' म्हणायला हवे. असे वाटते.

    Oct 07, 2022

    Add Comment

    संबंधित लेख

    लेख

    महिला आणि संपत्तीतील हक्क 

    स्नेहा भट, सीमा कुलकर्णी, स्वाती सातपुते, पल्लवी हर्षे 19 Dec 2021
    लेख

    ‘दंगल गर्ल’ लीना सिद्दी

    ज्योती भालेराव - बनकर 18 May 2022
    व्हिडिओ

    सिद्दींचे आरक्षण आणि स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम

    मार्गारेट अल्वा 17 May 2022
    व्हिडिओ

    सिद्दींचे खेळातील महत्त्व

    प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव-बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग 15 May 2022
    लेख

    पर्यायी मिडिया!

    दिलीप लाठी 02 Jan 2023

    लेखकाचे इतर लेख

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    यांना हे स्फुरण येते कोठून?

    आ. श्री. केतकर
    17 Feb 2023
    लेख

    आता सार्वकालिक सर्वश्रेष्ठ टेनिसपटू कोण?

    आ. श्री. केतकर
    30 Jan 2023
    लेख

    ‘टिळकपर्व’ वाचता वाचता...

    आ. श्री. केतकर
    18 Jan 2023
    व्यक्तिवेध

    पेले : त्याच्यासारखा केवळ तोच!

    आ. श्री. केतकर
    01 Jan 2023
    लेख

    भूक अहवाल, चौरस आहार, कुपोषण... खरे काय अन् खोटे काय!

    आ. श्री. केतकर
    29 Dec 2022
    लेख

    मेस्सीची स्वप्नपूर्ती आणि एम्बापेचा स्वप्नभंग

    आ. श्री. केतकर
    21 Dec 2022
    परिचय

    भारताच्या इतिहासातील 'टिळकपर्वा'चे मनोज्ञ दर्शन

    आ. श्री. केतकर
    15 Dec 2022
    लेख

    25 जागतिक अजिंक्यपदांचा मानकरी

    आ. श्री. केतकर
    03 Nov 2022
    लेख

    नेहरू-गांधी पर्वाचा वस्तुनिष्ठ शोध

    आ. श्री. केतकर
    30 Oct 2022
    परिचय

    तुकोबांशी मुक्त काव्य संवाद

    आ. श्री. केतकर
    11 Oct 2022
    लेख

    ‘त्या’ बंदुकीच्या गोळ्यांपासून दागिने बनवतात

    आ. श्री. केतकर
    04 Oct 2022
    लेख

    टेनिसचे 'फेडरर युग' संपले!

    आ. श्री. केतकर
    25 Sep 2022
    लेख

    ही आगामी काळाची चाहूल असेल?

    आ. श्री. केतकर
    12 Sep 2022
    लेख

    विकास व्हावा, पण 'अशा' पद्धतीनं नको!

    आ. श्री. केतकर
    08 Sep 2022
    लेख

    लेझीम पथकांना पुन्हा चांगले दिवस यावेत... 

    आ. श्री. केतकर
    01 Sep 2022
    लेख

    44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडची सांगता

    आ. श्री. केतकर
    12 Aug 2022
    लेख

    चेस ऑलिंपियाडच्या निमित्ताने...

    आ. श्री. केतकर
    28 Jul 2022
    लेख

    अलेक्झांडर सोल्झेनित्सिन आणि आपण

    आ. श्री. केतकर
    26 Jul 2022
    लेख

    आता प्रतीक्षा खुल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेची...

    आ. श्री. केतकर
    11 Jul 2022
    लेख

    सत्यमेव जयते!

    आ. श्री. केतकर
    03 Jul 2022
    लेख

    पहिली ट्रान्सजेन्डर खेळाडू डॉ. रेनी रिचर्डस

    आ. श्री. केतकर
    25 Jun 2022
    लेख

    असा विक्रम पुन्हा होणे अशक्यच वाटते!

    आ. श्री. केतकर
    07 Jun 2022
    लेख

    एस्केप टु व्हिक्टरी : एक आगळा क्रीडा - युद्ध (कैदी) पट

    आ. श्री. केतकर
    02 Jun 2022
    लेख

    रोलाँ गॅरोवर कार्लोस अल्काराझवर सर्वांचे लक्ष असेल

    आ. श्री. केतकर
    20 May 2022
    लेख

    भारतीय बॅडमिंटनपटूंचा ऐतिहासिक विजय

    आ. श्री. केतकर
    16 May 2022
    लेख

    हे नमन कुणासाठी?

    आ. श्री. केतकर
    08 May 2022
    परिचय

    माझा उसाचा मळा : ऊस शेतीचा सर्वंकष कोश

    आ. श्री. केतकर
    02 May 2022
    लेख

    फोर डेज ऑफ नेपल्स : युद्ध येता दारी

    आ. श्री. केतकर
    28 Apr 2022
    लेख

    जिद्दीचा महामेरू : राफा नदाल

    आ. श्री. केतकर
    03 Feb 2022
    लेख

    विश्वविजेत्यांवर भारताची निर्विवाद मात!

    आ. श्री. केतकर
    08 Dec 2021
    परिचय

    शोध पत्रकारितेचा वस्तुपाठ मांडणारे पुस्तक 

    आ. श्री. केतकर
    04 Dec 2021
    लेख

    भारतीय खेळाडूंना त्यांच्या क्षमतेची जाणीव नव्याने करून द्यावी लागेल

    आ. श्री. केतकर
    16 Nov 2021
    लेख

    सारे काही झाले ते कशासाठी... आयपीएलसाठी?

    आ. श्री. केतकर
    19 Sep 2021
    लेख

    आश्चर्यकारक, तितकेच अविश्वसनीय तरीही वास्तव!

    आ. श्री. केतकर
    16 Sep 2021
    लेख

    महत्त्व हुतात्म्यांच्या स्मारकाला नव्हे तर स्वतःच्या प्रतिमेलाच!

    आ. श्री. केतकर
    13 Sep 2021
    लेख

    त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली!

    आ. श्री. केतकर
    16 Jul 2021
    लेख

    आराखड्यांचे आडाखे 

    आ. श्री. केतकर
    07 Jul 2021
    लेख

    जागतिक अजिंक्यपद न्यूझीलंडकडे...

    आ. श्री. केतकर
    25 Jun 2021
    परिचय

    विचारांच्या कोलाहलाला आश्वासक प्रत्युत्तर देणारे दीर्घ काव्य... 

    आ. श्री. केतकर
    24 Jun 2021
    लेख

    ...तरीही अस्वस्थच वाटतंय !

    आ. श्री. केतकर
    24 May 2021
    लेख

    कोरोनाची दुसरी लाट आणि न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका 

    आ. श्री. केतकर
    28 Apr 2021
    परिचय

    अतिशय महत्त्वाच्या (पण दुर्लक्षित) विषयावरील बहुमोल पुस्तक...

    आ. श्री. केतकर
    24 Mar 2021
    परीक्षण

    दिसो लागे मृत्यू... परि न घाबरले हे...

    आ. श्री. केतकर
    17 Mar 2021
    लेख

    आता प्रतीक्षा 18 जूनची... 

    आ. श्री. केतकर
    10 Mar 2021
    लेख

    भारतीय संघाचे एक पाऊल पुढे...

    आ. श्री. केतकर
    27 Feb 2021
    लेख

    मालिकेतील रंगत वाढली...

    आ. श्री. केतकर
    17 Feb 2021
    लेख

    भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची खरी ‘कसोटी’

    आ. श्री. केतकर
    12 Feb 2021
    परिचय

    जागतिक पटलावरील भारताच्या भूमिकेचा विविधांगी आढावा घेणारे पुस्तक

    आ. श्री. केतकर
    09 Oct 2020

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....