जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं, पण ते तितकंसं खरं नाही! तुमच्या-माझ्या आसपास कितीतरी चांगल्या शाळा व चांगले शिक्षक आहेत. ते मन लावून, जीव ओतून काम करीत आहेत. तेथे शाळा आहे आणि शिक्षणही आहे! ही बाजू समोर आली पाहिजे असं वाटतं; म्हणजे काम करणाऱ्यांचा उत्साह वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल, किमान त्यांची निराशा दूर होईल ! या हेतूने सातारा जिल्ह्यातल्या 16 शाळांना भेटी देऊन तेथील उपक्रम, शाळेची बलस्थाने, शिक्षक, त्यांचे विशेष प्रयत्न याचे आशादायक चित्र लेखक दाखवतात.
त्यातील प्रकरण सहावे - आंबवडे खुर्द-भोंदवडेची उपक्रमशील शाळा (15 मिनिटांचा ऑडिओ) यात या शाळेतील शिक्षण, वातावरण, स्वच्छतागृहंकडे दिलेले विशेष लक्ष, मुले यांचे कौतुक या प्रकरणात आहे.
हे पुस्तक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे: शाळाभेट
Storytel वर आलेली साधना प्रकाशनाची ऑडिओबुक्स अवश्य ऐका.
Tags: shalabhet namdev mali sadhana prakashan storytel audiobook ऑडिओबुक शाळाभेट नामदेव माळी सातारा जिल्हा जिल्हा परिषद शाळा झेड पी जिल्हा परिषद शिक्षण उपक्रमशील शाळा साधना प्रकाशन आंबवडे खुर्द-भोंदवडे ambavade khurd bhondavde Load More Tags
Add Comment