द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी या पुस्तकामुळे वयाच्या चाळीशीतच जगप्रसिध्द झालेल्या विल ड्युरांट यांची ओळख द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या अकरा खंडात्मक ग्रंथामुळे मानवी सभ्यतेचा व संस्कृतीचा इतिहासकार अशी आहे. तत्त्वज्ञानाच्या भोवतीचे गुढतेचे वलय कमी करणारा वा तत्त्वज्ञानाला उंच मनोऱ्यावरून जमिनीवर आणणारा लेखक असेही ड्युरांटबाबत म्हटले जाते. त्यांचे अतिशय अलक्षित म्हणावे असे शंभरेक पानांचे पुस्तक 1932 मध्ये 'ऑन द मिनिंग ऑफ लाईफ' या नावाने प्रसिद्ध झाले होते. ते पुस्तक म्हणजे खरोखरच ड्युरांटने केलेल्या केवळ एका प्रयोगाची हकीगत आहे. ड्युरांट यांच्या जयंतीनिमित्ताने ऐकुया या प्रयोगाविषयी..
वाचन : मृदगंधा दीक्षित
Tags: Will Durant Load More Tags
Add Comment