साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'ग. प्र. प्रधान : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी प्रधान आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले.
या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. आपल्या 13 मिनिटांच्या भाषणात त्यांनी प्रधान सरांच्या व्यक्तिमत्त्वाला असणाऱ्या सहा आयामांकडे लक्ष वेधले.
या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.
Tags: प्रधान मास्तर चर्चासत्र साता उत्तराची कहाणी मौज प्रकाशन साधना साप्ताहिक ग. प्र. प्रधान Load More Tags
Add Comment