व्हिडिओ - यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी

साप्ताहिक साधनाच्या संपादकांचे निवेदन

5 ऑक्टोबर 1922 ते 10 मे 1998 असे 76 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या यदुनाथ थत्ते यांचे जन्मशताब्दी वर्ष 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाले आहे. 1948 ते 1982 अशी जवळपास तेहतीस वर्षे त्यांनी साधनाचे संपादन कार्य केले. सुरुवातीची आठ वर्षे सहसंपादक आणि नंतरची पंचवीस वर्षे मुख्य संपादक अशी त्यांची कारकीर्द होती. आंतरभारती आणि राष्ट्र सेवा दल या संस्थांसाठीही त्यांनी बरेच काम केले असले तरी त्यांची प्रमुख ओळख 'साप्ताहिक साधनाचे संपादक' अशीच होती. त्यांनी लहानमोठी दीडएकशे पुस्तके लिहिली. त्यामध्ये विज्ञानविषयक पुस्तकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केलेले निवेदन...

Tags: Weekly Sadhana Kartavya Sadhana Marathi साधना साप्ताहिक कर्तव्य साधना मराठी Vinod Shirsath विनोद शिरसाठ यदुनाथ थत्ते Yadunath Thatte जन्मशताब्दी Birth Centenary Load More Tags

Add Comment