व्हिडिओ - ग. प्र. प्रधान यांची जन्मशताब्दी

साप्ताहिक साधनाच्या संपादकांचे निवेदन

26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभले त्या ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष 26 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होत आहे. 1942 च्या चले जाव चळवळीत भूमिगत कार्य करून नंतर दोन वर्षे तुरुंगवास, स्वातंत्र्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात 20 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक, त्यानंतर 18 वर्षे विधान परिषदेचे सदस्य (त्यातील दोन वर्षे विरोधी पक्षनेते) आणि मग 14 वर्षे वसंत बापट यांच्यासह साधना साप्ताहिकाचे संपादक अशी त्यांची कारकिर्द होती. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक, राष्ट्र सेवा दलाचे बौद्धिक भरणपोषण करणारे कार्यकर्ते, समाजवादी शील असणारे नेते, मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मिळून दोन डझन पुस्तके असणारे लेखक अशीही होती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केलेले निवेदन...


साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :  

माझी वाटचाल 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत

लोकमान्य टिळक - पेपरबॅक  हार्डकवर

 

Tags: Weekly Sadhana Kartavya Sadhana Marathi साधना साप्ताहिक कर्तव्य साधना मराठी Vinod Shirsath विनोद शिरसाठ G. P. Pradhan ग. प्र. प्रधान गणेश प्रभाकर प्रधान Ganesh Prabhakar Pradhan Load More Tags

Add Comment