डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या 81 व्या जन्मदिनानिमित्त, 1 नोव्हेंबर 2026 रोजी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते. वक्ते होते विवेक सावंत आणि विषय होता, "स्पर्धा परीक्षांची पेपरफुटी कायमची थांबवता येईल?"
विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि त्यामुळे लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी निराशेच्या गर्तेत जाणे हे आता नित्याचे झाले आहे. या मुद्याच्या निमित्ताने एक देशव्यापी विद्यार्थी आंदोलन देखील उभे राहिले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने पेपर फुटण्याचे प्रकार पूर्णतः थांबवता येतील, त्यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करावे लागतील, मात्र ते बदल सुलभ व जलद करता येतील. ते कसे? या विषयावर विवेक सावंत यांनी विवेचन केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साधना साप्ताहिक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा 100 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. स्वागत व प्रास्ताविक 20 मिनिटे, व्याख्यान 60 मिनिटे, प्रश्न उत्तरे 15 मिनिटे आणि आभार 5 मिनिटे असा हा कार्यक्रम आहे. हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला जरूर फॉरवर्ड करू शकता.
Tags: vivek sawant technology learning technology exam technology education competitive exams supporting the system technology ecosystem तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा शयाक्षणिक तंत्रज्ञान Load More Tags
Add Comment