24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेल्या साने गुरुजींचे 125 वे जयंती वर्ष 24 डिसेंबर 2023 पासून सुरू झाले. त्यानिमित्ताने हे वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम महाराष्ट्राच्या लहान-मोठ्या गावांतून, लहान-मोठ्या संस्थांद्वारे होत राहतील. त्यातून गुरुजींच्या विचार-कार्याची उजळणी होईल, वैचारिक व कृतिशील वारशाला उजाळा मिळेल आणि त्यांची कालसुसंगता या ना त्या प्रकारे अधोरेखित होईल. त्यामुळे अनेक नव्या-जुन्यांना काही नवी दालने खुली होतील. त्यासाठी गुरुजींची लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील विशेष महत्त्वाच्या पुस्तकांच्या नव्या व आकर्षक स्वरूपातील आवृत्त्या टप्प्याटप्प्याने आणण्याचे काम साधना प्रकाशनाने यापूर्वीच हाती घेतले आहे. मागील तीन-चार वर्षांत डझनभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत, आणखी दोन डझन पुस्तके आगामी दोन वर्षांत प्रकाशित होतील.
गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने साधनाच्या विद्यमान संपादकांचे हे मनोगत..
Tags: विनोद शिरसाठ साधना साप्ताहिक साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सव साने गुरुज्जी Load More Tags
Add Comment