लेखन स्पर्धा : परिचय नव्हे, परीक्षण !

वाचन विशेषांकाचे परीक्षण करणारे लेख लिहा

साधना साप्ताहिकाने 23 एप्रिलला साजरा होत असलेल्या जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने 26 एप्रिल 2025 चा अंक "दृष्टीकोन आकार येईपर्यंतचे वाचन" या विषयावर काढला आहे. 84 पानांच्या या अंकात विविध क्षेत्रांतील 16 मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. या अंकाचे परीक्षण करणाऱ्या लेखांची स्पर्धा आम्ही आयोजित करीत आहोत.

सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो. तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींचे लेख या अंकात आहेत. त्यांचा दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून लिहिलेले हे लेख आहेत. या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.

हा अंक काळजीपूर्वक वाचून, त्याचे परीक्षण करणारा लेख या स्पर्धेसाठी पाठवावा. या लेखात, अंकाचा परिचय नव्हे तर परीक्षण अपेक्षित आहे. लेख एक हजार शब्दांचा असावा (पन्नास शब्द कमी किंवा जास्त चालतील.) 

स्पर्धेसाठी आलेल्या सर्व लेखांमधून सर्वोत्तम पाच लेखांना, साधना प्रकाशनाची प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची (MRP प्रमाणे) पुस्तके बक्षीस म्हणून दिली जातील. शिवाय, ते पाचही परीक्षण लेख पूर्णतः किंवा संक्षिप्त स्वरूपात साधना साप्ताहिकाच्या जून मधील पहिल्या किंवा दुसऱ्या अंकात प्रसिद्ध केले जातील. 

सर्वोत्तम पाच लेखांसाठी बक्षिसाची पुस्तके त्या त्या व्यक्तीच्या आवडीनुसार दिली जातील. साधना प्रकाशनाची 225 पुस्तकांची सूची त्या पाच जणांना पाठवली जाईल. त्यातून त्यांनी निवडलेली प्रत्येकी पाच हजार रुपये (MRP प्रमाणे) किमतीची पुस्तके त्यांना साधनाच्या खर्चाने पाठवली जातील.

लेख पाठवण्याची अंतिम तारीख 15 मे 2025 
स्पर्धेच्या निकालाची तारीख 23 मे 2025 
एक हजार शब्दांचा लेख टाईप करून किंवा हस्तलिखित स्वरूपात साधना कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने/ कुरियरने किंवा editor.sadhana2023@gmail.com वर ईमेल द्वारे पाठवावा.

साधना साप्ताहिकाचा हा छापील अंक साधना कार्यालयातून 50 रुपयांत विकत घेता येईल (पोस्टाने हवा असल्यास 80 रुपये)  किंवा weeklysadhana.in या वेबसाईटवर मोफत वाचता येईल, विनामूल्य डाउनलोड करून घेता येईल. किंवा खालील लिंकवर ऑनलाइन खरेदी करता येईल
https://sadhanaprakashan.in/product/drushtikon-aakarala-yeiparyantche-wachan/ 

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे , वयाची अट नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क: 
साधना साप्ताहिक
431, शनिवार पेठ, पुणे 411030
Ph 02024451724, 
Mob 95450 05138
weeklysadhana@gmail.com 
Website : weeklysadhana.in


 

Tags: जागतिक ग्रंथ दिन 23 एप्रिल दृष्टीकोन आकार येईपर्यंतचे वाचन संपटहिक साधना 26 एप्रिल 2025 लेखन स्पर्धा weekly sadhana sadhana digital wrtining competition 23rd april 2025 world book day 2025 world book day book day reading that shaped my outlook reading that shaped my thought reading that shaped me good reads सकस वाचन Load More Tags

Comments:

विषय कोणता

कोणत्याही विषयावर लिहिलेलं चालेल का

Madhav Chousalkar

अंक कुठे मिळेल वाचायला. मागवता येईल का

टीम कर्तव्य-साधना

@ Madhav Chousalkar साधना साप्ताहिकाचा हा छापील अंक साधना कार्यालयातून 50 रुपयांत विकत घेता येईल (पोस्टाने हवा असल्यास 80 रुपये) किंवा weeklysadhana.in या वेबसाईटवर मोफत वाचता येईल, विनामूल्य डाउनलोड करून घेता येईल. खालील लिंकवर ऑनलाइन खरेदी करता येईल https://sadhanaprakashan.in/product/drushtikon-aakarala-yeiparyantche-wachan/

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/