ऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 8

भारताच्या पहिल्या पंतप्रधानांची जडणघडण कशी झाली, त्यांचा दृष्टीकोन कसा आकाराला येत गेला, त्यांच्या भूमिका कशा आणि तशाच का राहिल्या, त्यांचे निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतले गेले याची विश्लेषणात्मक मांडणी करण्याच्या उद्देशाने सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे 'जवाहरलाल नेहरू - स्वातंत्र्यलढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान'. जवाहरलाल नेहरूंची विचारधारा, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची श्रीमंती, त्यांचे सौंदर्य आणि त्यांची लोकप्रियता या सगळ्याला नव्याने उधाण आलेलं असताना प्रत्येक भारतीयाने वाचावे असे हे पुस्तक.  साधना प्रकाशनाच्या या पुस्तकातील निवडक 15 लेख ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्यांचे वाचन केले आहे मृद्‌गंधा दीक्षित यांनी. सव्वासहा तासांचे हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील 'नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा' हे सव्वीस मिनिटांचे प्रकरण.

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक सुरेश द्वादशीवार जवाहरलाल नेहरू - स्वातंत्र्यलढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्टोरीटेल मृद्‌गंधा दीक्षित Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Jawaharlal Nehru Suresh Dwadashiwar Storytel Mrudgandha Dixit Load More Tags

Add Comment