धर्म हे गतकालीन राजकारण आहे का?

मन्वंतर या ऑडिओबुकमधील प्रकरण सातवे | अभिवाचक गौरी लागू

इतिहासातल्या बहुसंख्य नोंदी अशा, की त्यांचा संबंध राजकारणाशी आहे की धर्मकारणाशी हे नेमकेपणाने इतिहासकारालाही सांगता येऊ नये! खलीफांची सत्ता राजकीय असते की धार्मिक? रोमचं साम्राज्य धार्मिक होतं की राजकीय? छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य राजकीय असतं, की दिल्लीत स्थायिक झालेल्या इस्लामी राजवटी विरुद्ध एका हिंदू तरुणानी केलेलं धार्मिक धाडस? भारतावर झालेली मुस्लीम आक्रमण धार्मिक होती का राजकीय? तराजू घेऊन भारतात आलेल्या इंग्रजांनी पुढे तलवार हाती घेतली आणि नंतरच्या काळात आपली धार्मिक शिकवणही इथे आणली. धर्मसत्तेचे एकूण जीवनावरचे असे आधिपत्य एकोणिसाव्या शतकापर्यंतही कायम असल्याचं सांगणारंच हे चित्र आहे की नाही?

कट्टर हिंदुत्ववादी, अन्य धर्मीयांना डावलणारे, आणि एकाधिकारशाही मिरवणारे सरकार केंद्रात आहे. धर्मसत्ताच कशी आवश्यक आहे याबाबत प्रचार केला जातो आहे. केवळ हिंदुत्वच तुम्हाला तारू शकेल हे त्यांनी अनेकांना पटवून दिले आहे. केवळ हिंदुत्वाचे नव्हे तर एकूणच धर्माचे राजकारणातील महयत्त्व अभूतपूर्व प्रमाणात वाढले आहे, आणि त्याचा एकही चांगला परिणाम दिसून येत नाही, अशी आपली आजची परिस्थिती आहे. अशा वातावरणात धर्म आणि राजकारण यांच्या अभेद्य युतीचे गूढ समजून घेण्यासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या मन्वंतर या पुस्तकातील सातवे प्रकरण - धर्म हे गतकालीन राजकारण आहे का? ऑडिओ स्वरूपात सादर करत आहोत. हा 26 मिनिटांचा ऑडिओ आहे. 

हे पुस्तक साधन प्रकाशनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, आणि ऑडिओबुक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे.

Tags: सुरेश द्वादशीवार मन्वंतर धर्म राजकारण ऑडिओबुक Load More Tags

Comments:

आनंद गोसावी

धर्म आणि सत्ता हा संघर्ष नसून परस्परावलंबित व्यवहार आहे, हे जगाच्या इतिहासावरून स्पष्ट होते. तसेच, ज्ञानाचे सार्वभौमत्व मात्र स्पष्टपणे सिद्ध होते. कारण ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञान मानवी बुद्धीच्या कार्यकारणभावातुन निर्माण होत असली तरी ज्ञान साधनेशिवाय आणि उपयोगितेशिवाय ज्ञानवृद्धी आणि विकास अशक्य आहे. जिथे ज्ञान उपयोगिता भ्रष्ट होते, तिथे सत्ता कुरघोडीचे आणि बळाचे राजकारण करून ज्ञान महती नित्कृष्ट ठरवते. जो समाज ज्ञानी असूनही सत्तेशी, सत्यासाठी संघर्ष उभा करत नाही, तो समाज अधोगतीला जातो. तरीही अशा समाजाला आणि सत्तेला ज्ञानी पुरुष उदा लो टिळक, म गांधी सारखे समाज उद्धारक पुन्हा प्रगती पथावर आणतात. हाही इतिहास आहे आणि त्याची नोंद घेतली पाहिजे. सद्य परिस्थिती सत्ता आणि धर्म ह्यांची गल्लत आहे आणि भ्रष्टाचार हे राजकीय हत्यार झाले आहे. राष्ट्रवाद आणि राजकारण एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजकारणाला सोयीस्कर धर्म संकल्पना, हिंदुत्व... आणि राजकीय सामाजिकरण दुसऱ्या बाजूला...अशी सद्याची रचना अर्थकारण हाताशी धरून होत आहे.

Add Comment

संबंधित लेख