ऑडिओ : मोहम्मदला दिसलेले रंग | चित्रपट - कलर ऑफ पॅराडाईज

 'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 3

चार देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'कलर ऑफ पॅराडाईज' या पर्शियन भाषेतील इराणी चित्रपटावर हिनाकौसर खान-पिंजार यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'कलर ऑफ पॅराडाईज' या चित्रपटाविषयी...
इराणची राजधानी तेहरान येथील अंध मुलांच्या शाळेत शिकणारा बारा वर्षांचा मोहम्मद सुट्टीसाठी गावी जाता येईल याची प्रतीक्षा करतोय, पण त्याचे वडील त्याला घेऊन जाण्यास उत्सुक नाहीत. नाईलाज होतो तेव्हा घेऊन जातात, पण काही अंतरावरील दुसऱ्या गावात एका अंध सुताराच्या हाताखाली काम करायला पाठवतात. कारण काय तर पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरे लग्न करावे लागणार आहे, पण आधीचा अंध मुलगा आहे हे कळले तर ते लग्न होणार नाहीये. हृदय पिळवटून टाकणारी कथा सांगणारा चित्रपट - द कलर ऑफ पॅराडाईज!


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक साधना कर्तव्य कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज हिनाकौसर खान - पिंजार कलर ऑफ पॅराडाईज इराणी सिनेमा ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स स्टोरीटेल Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Heenakausar Khan- Pinjar The Color of Paradise Irani Movie Irani Cinema Audio Audiobook Audiobooks Storytel माजीद माजिदी Majid Majidi Load More Tags

Add Comment