• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • शिक्षणातला डिजिटल डिव्हाईड कमी करणारा कम्युनिटी रेडिओ 'विश्वास 90.8' 
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    शिक्षण लेख

    शिक्षणातला डिजिटल डिव्हाईड कमी करणारा कम्युनिटी रेडिओ 'विश्वास 90.8' 

    8 सप्टेंबर - जागतिक साक्षरता दिनानिमित्त 

    • हिनाकौसर खान
    • 08 Sep 2021
    • 2 comments

    जगभरात 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. 1966 मध्ये युनेस्कोनं साक्षरतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. यावर्षीची युनेस्कोची थीम 'Literacy for a human-cantered recovery: Narrowing the digital divide.' अशी आहे. या निमित्ताने नाशीकमधील रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओनं शिक्षणातील 'डिजिटल डिव्हाईड' कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची ओळख करून देणारा हा लेख.

    कोरोना काळात सर्वसामान्य माणसांचं जीवन विसकळीत झालं... तिथं मुलांची काय गोष्ट...! एक तर घरकोंडी आणि दुसरीकडं शाळाही बंद झाल्यानं मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला. त्यातच गेल्या दीडएक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही कोरोना काळानं प्रचंड प्रभाव पाडला. या संकटातून काही शाळांनी मार्ग शोधले. स्मार्टफोन, लॅपटॉप इत्यादींच्या साहाय्यानं ऑनलाईन शाळा घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू केले. काही शाळांनी शैक्षणिक अ‍ॅप्सही तयार केले मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबांतून येणाऱ्या मोठ्या वर्गाकडे स्मार्टफोन्स नाहीत की ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी दुसरी कोणतीही सोय नाही.

    एकीकडं आपण सर्व स्तरांवर डिजिटल होण्याचा दावा करतोय तर दुसरीकडं या डिजिटल युगातही साधानांच्या अभावामुळे काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं. नाशीकच्या रेडिओ विश्‍वास 90.8 या कम्युनिटी रेडिओनं यावर प्रयोगशील उपाय शोधला. रेडिओ भारतात सर्वदूर पसरला आहे त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा नसलेल्या अनेक भागांत आजही रेडिओच माहितीचं आणि मनोरंजनाचं साधन असतं. ही बाब लक्षात घेत साध्या मोबाईलवर असलेल्या एफएम सुविधेचा वापर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रसारणासाठी करण्याची कल्पकता रेडिओ विश्‍वास 90.8 या कम्युनिटी रेडिओनं करून दाखवली. कष्टकरी, गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणातला डिजिटल डिव्हाईड भरून काढण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल होतं.

    कोरोना काळातही आर्थिक निम्न वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवावं या उद्देशानं या कम्युनिटी रेडिओनं ‘शिक्षण सर्वांसाठी’ ही कल्पना साकारली. कम्युनिटी रेडिओ हे कम्युनिटीसाठी असतं या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहून त्यांनी सुरुवातीला नाशीकमधल्या मराठी माध्यमातल्या महापालिकेच्या शाळांमधल्या आणि आसपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी या ‘रेडिओ’द्वारे शिक्षण हा उप्रकम सुरू केला आणि तो कम्युनिटी रेडिओच्याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या इतरही भागांपर्यंत पोहोचवला. यामुळे इंटरनेटअभावी ऑनलाईन शिक्षणापासून एरवी वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आणि सोयीसुविधांच्या अभावी तयार होणारा डिजिटल डिव्हाईडही या उपक्रमामुळे भरून काढता आला.

    केंद्र शासनाद्वारे या उपक्रमाची दखलही घेण्यात आली. यंदाच्या वर्षी रेडिओ विश्‍वास 90.8 या कम्युनिटी रेडिओला माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दोन राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या उपक्रमाला सस्टेनॅबिलिटी मॉडेल पुरस्कार विभागात प्रथम क्रमांकाचं तर थिमॅटिक पुरस्कार विभागात दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

    समाजपरिवर्तनासाठी आणि विकासासाठी संशोधन करण्याच्या उद्देशानं 2000मध्ये 'विश्‍वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट' ही एनजीओ सुरू झाली. या एनजीओचं काम नाशीक शहरातल्या 55 झोपडपट्टी वसाहतींमध्ये चालतं. या वसाहतीतल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा प्रमुख उद्देश राहिला. या महिलांबरोबरच त्यांच्या मुलांसाठीही उपक्रमशील कार्यक्रम केले जातात, नशामुक्तीवर काम केलं जातं. याच एनजीओद्वारे रेडिओ विश्‍वास 90.8 हा कम्युनिटी रेडिओ चालवला जातो. कम्युनिटी रेडिओचा अर्थच कम्युनिटीनं कम्युनिटीसाठी चालवलेला रेडिओ असतो. तो साधारणतः दहा ते पंधरा किलोमीटर अंतरासाठी असतो. याच कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून विविध उपक्रमांची, कामाची माहिती लोकांपर्यंत, वसाहतीत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं.

    नाशीक शहरात रेडिओ ट्युन करून ऐकणारे दोन लाख नागारिक आहेत तर या रेडीओचे अ‍ॅपही आहे. त्या अ‍ॅपद्वारे 21 देशांमध्ये हा कम्युनिटी रेडिओ ऐकला जातो. याच रेडिओ विश्‍वास 90.8च्या माध्यमातून शिक्षणसेवेसाठी तब्बल 200 शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि तिसरीपासून दहावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमाचं प्रक्षेपण आणि रेकॉर्डिंग करण्यात आलं. नाशीकमधल्या पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या तब्बल पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

    या प्रयोगशील उपक्रमाविषयी माहिती देताना कम्युनिटी डायरेक्टर हरी कुलकर्णी म्हणाले, ‘कोवीड सुरू झाला. लॉकडाऊन सुरू झालं. शाळा बंद झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. खासगी, इंग्लीश माध्यमांतल्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली. पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांकडे लक्ष पुरवणं गरजेचं होतं. या शाळांमधली बहुतांश मुलं ही सर्वसाधारण कुटुंबांतली होती. त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईलही नव्हता. अशा मुलांनी काय करायचं हा विचार मनात आला आणि त्यातून ‘सर्वांसाठी शिक्षण’ या कल्पनेचा जन्म झाला. नाशीकमधल्या प्रशांत पाटील यांनी आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींनी कोविड काळात विविध उपक्रम राबवले होते. मुलांच्या शैक्षणिक नुकसानीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमानं ऑनलाईन वा डिजिटल माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि रेडिओच्या माध्यमातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी यांच्यामधलं अंतर कमी झाल्याचा आमचा अनुभव आहे.’

    नाशीक जिल्ह्यातल्या विविध शाळांमधले 200 शिक्षक एकत्र आले. हे सर्व शिक्षक ऐच्छिकरीत्या आपल्या शिक्षणसेवांचा लाभ देणार होते. यासाठी कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला त्यांना मिळणार नव्हता. या शिक्षकांनी त्यांच्या विषयतज्ज्ञतेनुसार लेक्चर्स घ्यायचे आणि ते त्याच वेळी रेकॉर्ड करायचे अशी रचना आखण्यात आली. तिसरीपासून दहावीपर्यंतचा रितसर अभ्यासक्रम रेडिओवर रेकॉर्ड करून प्रसारित केला गेला. रेडिओचं माध्यम असल्यानं ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, नेट कनेक्शन नाही अशा विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेणं शक्य झालं.

    या अनुभवाविषयी कुलकर्णी म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसांकडे बर्‍याचदा रेडिओ असतो नाहीतर किमान साधा फोन तरी होता. त्यावर ट्यून करून आमच्या कम्युनिटी रेडिओचा कार्यक्रम ऐकणं सोपं गेलं. इगतपुरी तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या काही शिक्षकांनी पैसे जमा केले आणि तिथल्या साडेपाचशे विद्यार्थ्यांना रेडिओ घेऊन दिला. त्यात यूएसबी, स्पिकर्स, ब्लूटूथ यांचाही समावेश होता. म्हणजे ज्यांच्याकडे रेडिओ नाही त्यांचीही सोय करण्यात आली. 'शिक्षण सर्वांसाठी' या उपक्रमाचं विद्यार्थी, पालक, शिक्षण यांनी आणि शाळांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं. पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या तब्बल पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. शेतमजुरी करणाऱ्या आणि शहरांमध्ये घरकाम करणार्‍या महिलांची मुलं या सगळ्यांना उत्कृष्ट शिक्षकांकडून शिकता आलं. पालकांनी त्यासाठी समाधान व्यक्त केलं. विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासासाठी दोनतीन तास मोबाईल घेऊन बसतो तेव्हा तो  नेमकं काय करतोय, लॉगीन करून इतर गेम्स तर खेळत नाहीये ना यावर लक्ष ठेवणं पालकांसाठी अवघड होतं. दृक-श्राव्य माध्यमाऐवजी श्राव्य माध्यम असल्यानं मुलं वाह्यातपणा करणार नाहीत याची खातरी पालकांना वाटायला लागली. शिवाय मुलं नक्की काय ऐकताहेत हे पालकांनाही कळत होतं.’

    या कम्युनिटी रेडिओच्या शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाची सुरुवात जून 2020मध्ये झाली. त्यासाठी जून ते सप्टेंबर 2020 या काळात शिक्षक स्टडिओमध्ये येत असत. त्यांच्या लेक्चर्सच्या थेट प्रक्षेपणासोबत रेकॉर्डिंगही करण्यात यायचं. मराठी, हिंदी, इंग्लीश, संस्कृत या भाषा तर बीजगणित, भूमिती, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र अशा सर्व विषयांचा समावेश राहिला. केवळ नाशीकपुरताच हा उपक्रम मर्यादित राहिला नाही. वाशीम जिल्ह्यातला स्वतंत्रता कम्युनिटी रेडिओ आणि वत्सागुल्म कम्युनिटी रेडिओ, सातार्‍यातील मनदेशी तरंगवाहिनी कम्युनिटी रेडिओ, सांगलीतला येरला वाणी कम्युनिटी रेडिओ, वर्ध्यातला एमजीआईआरआई कम्युनिटी रेडिओ, बारामतीतला शारदा कृषी वाहिनी कम्युनिटी रेडिओ या माध्यमांतून इतर भागांतल्या विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं. सोयीसुविधांचा अभाव असणार्‍या विद्यार्थ्यांना या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्याचा हा प्रयत्न होता.

    नियमित शाळा सुरू झाल्यानंतर हाच आशय-मजकूर यूट्युबवर अपलोड करण्याचा शिक्षकांचा विचार असल्याचंही कुलकर्णी यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘वर्ष बदललं तरी अभ्यासक्रम बदललेला नाही. रेकॉर्डिंग जरी मागच्या वर्षींच असलं तरी त्यांचं याही वर्षी पुनःप्रसारण करत आहोत. शिक्षक-विद्यार्थ्यांशी जोडलेले राहतील यासाठीही प्रयत्न केला आहे. एकदा केलं आणि टाकून दिलं असा आमचा कार्यक्रम नाही. सस्टेनॅबिलिटीच्या या संकल्पनेमुळेच आम्हाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशयदृष्ट्या, मानव तसंच संसाधनदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या एखादा उपक्रम किती सस्टनेबल आहे हे तपासून हा पुरस्कार दिला जातो. या विभागात आमच्या कम्युनिटी रेडिओला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर थिमॅटिक विभागात म्हणजे ज्यात एखाद्या थीमवर आधारित कार्यक्रमासाठी दुसरा पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे करोना काळामध्ये शिक्षणाची जी अवस्था होती तिच्यावरचा उपाय म्हणून रेडिओसारख्या साधनाचा उपयोग होऊ शकतो आणि डिजिटल डिव्हाईड कमी करता येऊ शकतो याचा अनुभव आम्ही घेतोय. सध्या टीव्ही-मोबाईलचं व्यसन खूप वाढत आहे. दृक-श्राव्यपेक्षा श्राव्य माध्यमातून आम्ही ते करू शकलो.’

    करोना काळात तंत्रज्ञानाच्या आणि सोयीसुविधांच्या अभावी तयार झालेला डिजिटल डिव्हाईड कमी करण्याचं मोठं काम कम्युनिटी रेडिओंनी पुढाकार घेऊन केलं, त्याचंच हे एक उदाहरण!

    - हिनाकौसर खान
    greenheena@gmail.com


    विश्‍वास 90.8 च्या कामाविषयी माहिती देणारा व्हिडिओ

     

    Tags: साक्षरता दिवस जागतिक साक्षरता दिन डिजिटल डिव्हाईड विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ हिनाकौसर खान- पिंजारी Literacy Day Digital Devide Vishwas 90.8 Community Radio Heenakausar khan Pinjar Load More Tags

    Comments:

    Hira janardan

    हे अतिशय कल्पक व क्रांतिकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे का पोहोचले नाही?

    Sep 13, 2021

    अंकुर भिकाजी आहेर

    गेल्या वर्षभरापासून मी विश्वास रेडिओ सोबत जोडलेलो. आपण हाती घेतलेले कार्य अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. शिक्षण क्षेत्रातील आपले योगदान खूपच अप्रतिम व अनुकरणीय आहे. धन्यवाद! - मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली (प.)

    Sep 08, 2021

    Add Comment

    संबंधित लेख

    लेख

    ऑनलाईन शिक्षण आणि आपण

    स्नेहलता जाधव 21 Jun 2020
    लेख

    आमदार प्रशांत बंब यांच्या निमित्ताने...

    संजय करंडे 10 Sep 2022
    लेख

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन : तत्त्वज्ञ शिक्षक

    नरहर कुरुंदकर 05 Sep 2022
    मुलाखत

    एखादी शाळा चांगली करणं म्हणजे युध्द जिंकणं!

    नामदेव माळी 05 Sep 2019
    लेख

    शिक्षण सुरूच राहावे यासाठी…

    अमित कोहली 02 Jun 2020

    लेखकाचे इतर लेख

    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    ऑडिओ

    सांग वू आणि त्याची आजी

    हिनाकौसर खान
    19 Oct 2022
    ऑडिओ

    पूर्णा मलावत (तेलंगणा) : तांड्यातून एव्हरेस्टवर

    हिनाकौसर खान
    29 Apr 2022
    वृतांत

    मराठी संशोधन मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष 

    हिनाकौसर खान
    02 Feb 2022
    लेख

    बोलती हुई औरतें...

    हिनाकौसर खान
    18 Jan 2022
    लेख

    जोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात

    हिनाकौसर खान
    21 Dec 2021
    ऑडिओ

    ऑडिओ : मोहम्मदला दिसलेले रंग | चित्रपट - कलर ऑफ पॅराडाईज

    हिनाकौसर खान
    23 Oct 2021
    ऑडिओ

    ऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी

    हिनाकौसर खान
    09 Sep 2021
    लेख

    शिक्षणातला डिजिटल डिव्हाईड कमी करणारा कम्युनिटी रेडिओ 'विश्वास 90.8' 

    हिनाकौसर खान
    08 Sep 2021
    लेख

    लग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग

    हिनाकौसर खान
    13 Jun 2021
    लेख

    घटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील!

    हिनाकौसर खान
    05 Mar 2021
    लेख

    कोरोनाकाळातील सांप्रदायिकरण

    हिनाकौसर खान
    20 Feb 2021
    लेख

    धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या

    हिनाकौसर खान
    14 Feb 2021
    व्यक्तिवेध

    ‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील

    हिनाकौसर खान
    22 Jan 2021
    परिचय

    पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक

    हिनाकौसर खान
    08 Jun 2020
    लेख

    अनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम

    हिनाकौसर खान
    30 Mar 2020
    रिपोर्ताज

    पुण्याचं शाहीन बाग

    हिनाकौसर खान
    14 Feb 2020
    कथा

    मुमताज

    हिनाकौसर खान
    07 Jan 2020
    लेख

    हेल्लारो- गरब्यातून स्त्री मुक्ती मांडणारा चित्रपट

    हिनाकौसर खान
    09 Nov 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....