सांग वू आणि त्याची आजी

साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सहा लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकात 'द वे होम' या कोरियन भाषेतील, द. कोरियन चित्रपटावर हिनाकौसर खान यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'द वे होम' या सिनेमाविषयी...

सारखं सारखं गेम खेळल्यामुळं शेवटी त्याची बॅटरी संपते. बॅटरी आणण्यासाठी तो आजीकडे पैसे मागायला येतो. तिला लाडीगोडी लावतो. आपण आईकडून पैसे घेऊन तिचे तिला परत देऊ असं आमिषही दाखवतो. पण आजी बिचारी गरीब आहे. तिच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळं ती त्याला देऊ शकत नाही. ती स्वतःच्या छातीवर वर्तुळाकार हात फिरवून ‘सॉरी’ म्हणण्याचा प्रयत्न करते. आजीच्या त्या प्रकारच्या कृतीचा त्याला कधीच अर्थ कळत नसतो. त्याला राग येतो, आजी हे काय करत असते.


साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...


साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला 


साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला 

Tags: बालकुमार सिनेमा मुलांसाठीचे चित्रपट बालचित्रपट स्टोरीटेल ऑडिओ हिनाकौसर खान Load More Tags

Add Comment