ऑडिओ : बिनियाची सुंदर छत्री | चित्रपट - द ब्लू अम्ब्रेला

 'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 2

चार देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'द ब्लू अम्ब्रेला' या हिंदी चित्रपटावर मृद्‌गंधा दीक्षित यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'द ब्लू अम्ब्रेला'या चित्रपटाविषयी...
हिमाचल प्रदेशातील एका खेड्यातील बिनिया नावाची बारा वर्षांची मुलगी जनावरे चरायला घेऊन डोंगरात जाते, तेथे काही जपानी पर्यटक तिला भेटतात. त्यांच्याकडे असलेली निळ्या रंगाची मोठी व आकर्षक छत्री तिला आवडते. स्वतःकडील नेकलेस देऊन त्या बदल्यात छत्री मिळवते. आई प्रचंड रागावते. पण अशी वस्तू गावात कोणाकडेच नाही म्हणून बिनियाला वेगळेच ग्लॅमर प्राप्त होते. गावातील एकमेव दुकानदार असलेल्या नंदू खत्रीला त्या छत्रीचा हेवा वाटतो. ती मिळवण्यासाठी तो हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यातून घडणार नाट्य म्हणजे 'द ब्लू अम्ब्रेला'...


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज मृदगंधा दिक्षित द ब्लू अम्ब्रेला ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Mrudgandha Dixit The Blue Umbrella Audio Audiobook Audiobooks मृद्‌गंधा दीक्षित Vishal Bhardwaj विशाल भारद्वाज Load More Tags

Comments:

दत्तात्रय प. जोशी

बिनियाची सुंदर छत्री | चित्रपट - द ब्लू अम्ब्रेला हि कथा ऐकण्याआधी मी हे पुस्तक किंवा चित्रपट पाहीलेला नव्हता. कथा ऐकत असताना माझ्या डोळ्यांपुढे ते गाव आणि त्यातल्या सर्व घटना दिसू लागल्या. उत्तम लेख आणि कथाकथन. आता मी हे पुस्तक वाचणार आहे, तसेच हा चित्रपटही बघणार आहे. आपण सकळ्यांही हे पुस्तक वाचुया आणि चित्रपटही बघुया.

Add Comment