सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकात 'व्हिलेज रॉकस्टार्स' या आसामी भाषेतील, भारतीय चित्रपटावर मृद्गंधा दीक्षित यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.
'व्हिलेज रॉकस्टार्स' या सिनेमाविषयी...
भास्कर लगेच सॉरी म्हणतो. लगेच गँगमध्ये सामील होतो. शाळेतल्या मोठ्या मुलांचा शाळेचा बँड असतो. त्यांच्याकडे गिटार असते. संगीत हॉलच्या खिडकीतून बाहेरून धुनु आणि गँग गिटारकडे बघत बसतात. मग सगळे मिळून बाजारात जातात. गिटार कुठं मिळते, किती रुपयाला मिळते याची चौकशी करतात. गिटार शहरात मिळत असते. आणि खूप महाग असते. गँगमधली मुलं मग गिटारचा नाद सोडून थर्माकोलवर समाधान मानतात. पण धुनु मात्र तशी नसते. गिटार मिळवायचीच, असा ती ध्यास घेते.
साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला
साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला
Tags: बालकुमार मुलांसाठीचे सिनेमे बालवाङ्मय साहित्य कथा सिनेमा भारतीय चित्रपट बालकुमार दिवाळी अंक साधना बालकुमार Load More Tags
Add Comment