आज भारतात निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीत सामान्य लोकांच्यात प्रक्षोभ निर्माण करण्यात, किंबहुना लोकांची दुराग्रही आणि घातक मते घडवण्यातही माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. आज प्रसारमाध्यमांत (आणि समाजमाध्यमांतही) प्रसिद्ध होणारा 'कंटेंट' पाहून युद्धज्वर निर्माण होतो आहे, आणि फूट पडते आहे. अशा परिस्थितीत 'लोकसमूहांची मतं आणि श्रद्धा कशा (बि)घडतात? गट कसे पडतात?' हा विचार अवश्य केला पाहिजे.
वाचावे कसे' हे शिकवण्यासाठी 'नवी क्षितिजे' हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले 'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक 'द क्राउड' आणि 'द ट्रू बिलिव्हर' या दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे 'झुंडी' आणि 'सच्चा अनुयायी' या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि 'झुंडीचे मानसशास्त्र' हे एकसंध पुस्तक तयार केले. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले असून, ओंकार गोवर्धन यांनी त्याचे वाचन केले आहे. पंधरा तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील 'झुंडीची मते आणि श्रद्धा' या एका प्रकरणाचा हा भाग आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय समाजातील वेगवेगळ्या गटांची मतांनी वेगवेगळे टोक गाठले आहे, त्याने पुन्हा एकदा हेच सिद्ध होत आहे की लोकांच्या मनातील ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले पिढ्या न् पिढ्यांचे द्वेष, भीती आणि असुरक्षितता यांचा वापर करून घेऊन राजकीय हेतूने नकारात्मकता पसरवली जाऊ शकते. माणसांना व्यक्ती म्हणून विचार करू न देता झुंडीचा भाग म्हणून विचार करायला भाग पाडता येते. झुंडीची मतं काशी घडवली जातात यावर प्रकाश टाकणारा हा 13 मिनिटांचा ऑडिओ आहे.
'झुंडीचे मानसशास्त्र' हे पुस्तक Storytel वर ऐकण्यासाठी क्लिक करा -
साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
Tags: नवी क्षितिजे कार विश्वास पाटील विश्वास पाटील ऑडिओबुक ओंकार गोवर्धन झुंडीचे मानसशास्त्र झुंडीची मते आणि श्रद्धा झुंड झुंडशाही लोकशाही मते लोकमत जनमत पब्लिक Load More Tags
Add Comment