एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेतील नागरी युद्धानंतर तेथील गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाली. त्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून खूप मोठे कार्य केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याची हकीगत सांगणाऱ्या ‘Up From Slavery’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे 'गुलामगिरीतून गौरवाकडे'...
शाळांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. सुट्टीच्या काळात मुलांनी काय वाचावे, काय उपक्रम करावे, काय शिकावं असे विचार मुले स्वतः, पालक आणि शिक्षक करत असतात. वैचारिक-भावनिक दृष्ट्या समृद्ध करणारी पुस्तकंत्यांच्या हाती पडावीत, हा त्यातला एक महत्त्वाचा विचार असतो. असेच एक पुस्तक आहे 'गुलामगिरीतून गौरवाकडे'.
यातील 'प्रकरण 10 - गवत नसताना विटा' मध्ये अपरिहार्यपणे प्रचंड कष्टाचे जीवन वाट्याला आलेल्या आणि त्यामुळे शारीरिक श्रमाबद्दल घृणा निर्माण झालेल्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा जाणवून देण्याचे, स्वतःच्या कष्टाचे मोल शिकवण्याचे प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची गोष्ट आहे.
हे पुस्तक विक्रीसाठी साधना प्रकाशनाच्या वेबसाइटवर येथे उपलब्ध आहे. तसेच ते ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) उपलब्ध असून त्याचे वाचन केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार ओंकार गोवर्धन यांनी. या पुस्तकातील हे 19 मिनिटांचे ऐका ऑडिओ स्वरुपात. साडेतास तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.
साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
Tags: storytel booker t washington black life black lives matter american civil war upliftment of the african american बुकर टी वॉशिंग्टन वर्णद्वेष वर्णसमानता अमेरिकेतील नागरी युद्ध कृष्णवर्णीयांचा संघर्ष कृष्णवर्णीयांचा विकास ओंकार गोवर्धन स्टोरीटेल ऑडिओबुक साधना प्रकाशन sadhana prakashan omkar govardhan slavery up from slavery mukund vajhe मुकुंद वझे Load More Tags
Add Comment