ऑडिओ : अहमदने घेतलेला शोध | चित्रपट - व्हेअर इज् द फ्रेंड्स होम?

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 4

चार देशांतील सहा सिनेमा अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'व्हेअर इज् द फ्रेंड्स होम?' या पर्शियन भाषेतील इराणी चित्रपटावर समीर शेख यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'व्हेअर इज् द फ्रेंड्स होम?' या सिनेमाविषयी...
इराणमधील एका शाळेत दोन खेडेगावातील मुले आहेत. एका गावातला मोहम्मद आणि दुसऱ्या गावातील अहमद. पुन:पुन्हा सांगूनही मोहम्मद त्याचा गृहपाठाची वही आणत नाही म्हणून शिक्षक त्याला तंबी देतात, 'उद्या वही आणली नाहीस तर शाळेतून काढून टाकले .जाईल.' त्या रात्री अहमदला कळते, मोहम्मदची  गृहपाठाची वही तर चुकून आपल्या दप्तरात आलेली आहे. आईला तो तसे सांगतो, ती रागावते. पण तो वही द्यायचे ठरवतो आणि घरातून निघतो. दुसऱ्या गावात राहणाऱ्या मित्राचे घर शोधणाऱ्या अहमदचा प्रवास मांडणारा चित्रपट - व्हेअर इज् द फ्रेंड्स होम?


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक साधना कर्तव्य कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज समीर शेख व्हेअर इज् द फ्रेंड्स होम? अब्बास कियारोस्तमी इराणी सिनेमा ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स स्टोरीटेल Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Sameer Shaikh Where is the friends Home Abbas Kiarostami Iranian Movie Iranian Cinema Audio Audiobook Audiobooks Storytel Load More Tags

Add Comment