प्रिय वाचक,
डॅनियल मस्करणीस व डॉ. ऐश्वर्या रेवडकर हे दोन युवा लेखक, साधना साप्ताहिकाला 2018 मध्ये अगदी अचानक सापडले. डॅनियल हा इंजिनियर तर ऐश्वर्या ही डॉक्टर. त्या वर्षी डॅनियलने 'मंच' (खरे तर विवेकमंच) ही लेखमाला लिहिली आणि ऐश्वर्याने 'बिजापूर डायरी'. दोन्ही लेखमालांची पुस्तके साधना प्रकाशनाकडून 2020 व 2021 मध्ये आली, ती त्यांची पहिली पुस्तके. त्या दोन्ही पुस्तकांना, लागोपाठच्या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिले जाणारे (लेखकाच्या पहिल्या प्रकाशित पुस्तकासाठी) ताराबाई शिंदे ललितगद्य पारितोषिक मिळाले.
आता त्या दोन्ही युवा लेखकांचे दुसरे पुस्तक गेल्या महिन्यात प्रकाशित झाले आहे. अर्थात त्या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक वेगवेगळे आहेत. डॅनिअलचे पुस्तक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, ते मनोविकास प्रकाशनाकडून आले आहे, त्या पुस्तकाच्या निमित्ताने ऐश्वर्याने घेतलेल्या डॅनियलच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. धन्यवाद.
- संपादक, साधना
हेही वाचा :
Tags: मुलाखत नवे पुस्तक पुस्तक आणि लेखक डॅनियल मस्करणीस ऐश्वर्या रेवडकर साधना प्रकाशन साधना डिजिटल Load More Tags
Add Comment