तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङमय, हा 18 खंडांचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. या प्रकल्पाचे संपादक सुनीलकुमार लवटे यांची दीर्घ व्हिडिओ मुलाखत दोन भागांत घेतली आहे. पहिला भाग 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते तरी कोण?' आणि दुसरा भाग 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङमय प्रकल्पात आहे तरी काय?' हे दोन्ही भाग अनुक्रमे 75 मिनिटे व 65 मिनिटे इतके मोठे आहेत. या मुलाखतींमधला दुसरा भाग इथे सादर करत आहोत. मुलाखत घेतली आहे विनोद शिरसाठ यांनी..
साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेसाठी ही मुलाखत घेतली आहे. हे दोन्ही भाग शब्दांकन करून साधना साप्ताहिकाच्या 30 मार्च 2024 च्या अंकात प्रसिद्ध केले आहेत. संपूर्ण मुलाखत 28 पानांची झाली आहे, जिज्ञासूंनी ती जरुर वाचावी.
- संपादक, साधना साप्ताहिक
Tags: vinod shirsath laxmanshastri joshi मुलाखत लक्ष्मणशास्त्री जोशी सुनीलकुमार लवटे ऐवज साधना डिजिटल महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ वाई sadhana digital Load More Tags
Add Comment