ऑडिओ :आजच्या काळात नष्ट झालेली निरागसता अर्नाळकरांच्या रहस्यकथांमध्ये सापडते 

बाबूराव अर्नाळकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त...  

मराठी वाचकांच्या तीन पिढ्यांना रहस्यकथांनी भुरळ घालणारे विक्रमी रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर (1907/1909 - 1996) यांचा आज (4 जुलै) 25 वा स्मृतिदिन. 1200 हुन अधिक रहस्यकथा लिहिणारे अर्नाळकर आणि त्यांच्या रहस्यकथा यांच्याविषयी सांगताहेत लेखक- दिग्दर्शक निखिलेश चित्रे... 

Tags: ऑडिओ निखिलेश चित्रे बाबूराव अर्नाळकर साहित्य व्यक्तिवेध रहस्यकथा Marathi Audio Nikhilesh Chitre Baburao Arnalkar Literature Suspense Thriller Load More Tags

Comments: Show All Comments

अरविंद निगळे

माझ्या माहितीप्रमाणे बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इंग्रजी कादंबर्‍यांचे रुपांतर अशा होत्या. फारच थोड्या कथा त्यांच्या व स्वतंत्र अशा होत्या. गिरगावातील त्यांच्या चष्म्याच्या दुकानात मागच्या केबीनमध्ये बसून इंग्रजी कादंबरी हातात घेऊन तिचे on-the-fly रुपांतर बाबूराव आपल्या लेखिकेला सांगायचे व ते ती लिहून घेऊन थेट प्रकाशकाकडे खिळे जुळवणी करायला पाठवीत असे. त्या रुपांतरीत कादंबरीवर नंतर काही संस्कार करण्याची गरज पडत नसे. बाबूरावांचा हा सिद्धहस्तपणा वाखाणण्याजोगाच होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बाबूराव एका महिन्यात सहा ते आठ "माला" चालवीत सहा ते आठ कादंबर्‍या लिहायचे हा कामाचा झपाटा तर होताच. पण इंग्रजी कादंबर्‍या रुपांतरीत केल्याखेरीज हे शक्य नव्हते, हेही तेवढेच खरे. एस. एम. काशीकर (धूमकेतू व नाईटकिंग) व गुरुनाथ नाईक (कॅप्टन दीप, गोलंदाज वगैरे), राजा पारगावकर (अजगर) आणि अशोक व्हटकर (भीमसिंग "सम्राट") असे ताज्या दमाचे नायक व अधिक ताजे कथा वातावरण आणल्यावर बाबूराव अर्नाळकरांची रहस्यकथाकार म्हणून असलेली कारकीर्द अस्तंगत पावली. मी आज ६८ वर्षे वयाचा आहे. माझ्या वाचनाची (व लेखनाची आद्य ) स्फूर्ती बाबूराव अर्नाळकरच आहे, हे मी नम्रपणे नमूद करतो - प्रा. अरविंद निगळे ५ जुलै २०२१.

Vinod Phadke

माझा जन्म १९३७ सालचा.१० व्या वर्षापासून ते १५ ब्या वर्षापर्यंत म्हणजे १९४७ ते १९५२ साल पर्यंत रहस्य कथा वाचायचा नाद होता. त्यात मुख्यती बाबुराव अर्णाळकर यांच्या ज्यास्तीत जास्त. पण भावे यांच्या गुण वर्णनाचा भाव आज कळला. अगदी बरोबर आहे तो. .

Vinayak Ghode

निखिलेशचं हे छोटेखानी वाटणारं विश्लेषण वाचनाची सजगता वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूप मोलाचं आहे. बाबूरावांच्या रहस्यकथांचा रसास्वाद देत असताना, एकूणच, वाचताना काय काय ध्यानात असावं याबाबतच्या समग्रतेचं भान यातून येतं. निवेदनशैली ऐकत राहावं अशी प्रवाही आहे. धन्यवाद.

Gopal Chippalkatti

निखिलेशला लक्ष लक्ष धन्यवाद. किती सुंदर सारग्रहण. बाबुरावांच्या लेखनाचा केंद्रबिंदू निरागसतेत मांडून त्याने त्याच्या वाचनाची समग्रता, सखोलता सिद्ध केली आहे. आकलन सुलभता हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. या पेक्षा चांगला अर्नाळकर लेखन परिचय अशक्य आहे अशी खात्रीची भावना होतेय. होय अर्नाळकरांच्या गारुडानं झपाटलेलं एक झाड मी ही होतो. या गारुडाच्या मूलमंत्राने अर्नाळकर वाचनोत्तर आयुष्याला टोक आलेले लक्षात येते. विश्वाचा पसारा आणि जीवनाचा पसरटपणा भेदून मर्माला भिडण्याचा धडा या रहस्य कथांनी कायमचा गाठीशी बांधून दिला आहे. रहस्यकथा या नावाऐवजी रहस्य शोध कथा हे या कथांचे खरे स्वरूप आहे. मग कथेच्या अवकाशात लेखकाने लपवलेली किंवा तपशीलात हरवलेली मर्मस्थळे लेखकाबरोबरच वाचकाला शोधावा लागतो, शोधाची इच्छा होते, प्रयास होतो. एकदा का हे क्रमचक्र आयुष्यात सुरू झाले की त्याची सतत सोबत राहते. हे माझ्यासाठी अर्नाळकरांचे ऋण. निखिलेशचा निरागस ध्वनी आजचा माझा दिवस बनवून गेला.

Vikas yadav

खूप छान विश्लेषण, आणि ते ही गोड आवाजात ऐकायला मिळाल्यानं धन्यवाद!! पुढच्या अशाच माहितीपूर्ण साहित्य समीक्षेची आतुरता आहे....

Machindra Borhade

निखिलेश, रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या कथांची वैशिष्टये खूप छान पद्धतीने समजावून दिली. अप्रतिम विवेचन.

मीना वैशंपायन

निखिलेश, अर्नाळकरांची वैशिष्ट्ये चांगली विशद केली गेली. गो.ना.दातार यांच्या कालिकामूर्ती व शालिवाहन शक या रहस्यमय कादंब-याही चांगल्या, सशक्त कथानक असलेल्या वाटतात. पुढे दीनानाथ लाटे यांचीही कठपुतळीचा खेळ व आणखी एक कादंबरी वाचल्या होत्या. त्यांच्या कादंब-यांची रचना फार छान असे. पण त्यांनी आणखी काही लिहिल्याचे माहीत नाही.असो. अभिनंदन.

दीपक पाटील

अर्नाळकर अर्थात चंद्रकांत चव्हाण यांचा लेखनकाळ व लेखनाची पद्धत समजली. कालानुरुप केलं गेलेलं विवेचन फारच छान ! जनमाणसावरील असणारा त्यांचा प्रभाव अभ्यासपूर्ण रितीने मांडलात. धन्यवाद !

Add Comment