विख्यात वास्तुविशारद आणि लेखक नरेंद्र डेंगळे यांनी संपादित केलेला 'महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल' हा कोशात्मक ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने दोन खंडांत (एकूण पृष्ठे 800) प्रकाशित केला आहे. गेल्या आठशे वर्षांतील महाराष्ट्रातील वास्तुकलेची वाटचाल, त्यासंबंधी विविध बाजूंनी केलेले सचित्र रसग्रहण असा त्याचा आवाका आहे. हा ग्रंथ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध झाला आहे.
पहिला खंड : परंपरा
यात वास्तुकलेच्या वैचारिक, धार्मिक परंपरा, बांधकाम आणि तंत्रज्ञान, अनेक शतके टिकून असलेल्या वास्तु, बांधकामाचे माध्यम आणि साधने, वास्तुकला / वास्तुशास्त्राचे ग्रंथ, सौंदर्याच्या कल्पना याविषयी तज्ज्ञांचे लेख.
दुसरा खंड : वाटचाल
वास्तूंच्या कोटी - आदिम / पर्यावरणीय (नैसर्गिक संसाधने वापरुन आणि निसर्गाला धक्का ना पोहोचवता बांधलेल्या वास्तू), लोकवास्तुकला, समूहाच्या आणि जमातींच्या वास्तू, धर्मनिगडित वास्तुकला, उपयुक्ततेचे निकष, व्यावसायिकता, व्यवहार, गरजू वास्तुकला (भूकंप / पूर / युद्ध यांच्याशी सामना करण्यासाठी), कारखाने, हॉस्पिटल्स वगैरेची तार्किक, गरजू वास्तुकला, कला-वास्तुकला, जोखीम, नवीन कल्पना या विषयांचा समावेश दुसऱ्या भागात आहे.
या ग्रंथाच्या निमित्ताने संपादक नरेन्द्र डेंगळे आणि सहसंपादक मीनल सगरे, चेतन सहस्रबुद्धे व पुष्कर सोहोनी, या चौघांचा संवाद साधना साप्ताहिकाने 'ऐवज' या मालिकेसाठी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा हा सव्वा तासाचा व्हिडिओ आहे.
Tags: architecture architecture in maharashtra maharashtrian architecture narendra dengle pushkar sohani chetan sahasrabuddhe minal sagare meenal sagre meenal sagare minal sagre ancient architecture नरेंद्र डेंगळे चेतन सहस्रबुद्धे मीनल सगरे पुष्कर सोहनी pushkar sohni वास्तुकला पारंपरिक वास्तुकला महाराष्ट्राची वास्तुकला धार्मिक वास्तुकला वास्तुशास्त्र वास्तुरचना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ साहित्य - संस्कृति मंडळ Load More Tags
Add Comment