सहकार चळवळीच्या अंधार्‍या बाजूवर प्रकाशझोत टाकणारा सिनेमा

'सामना' चित्रपटाची पन्नास वर्षे

“मारुती कांबळेचे काय झाले?” हा चित्रपटातला कळीचा प्रश्न तत्कालीन समाजात केवळ कथेचा भाग राहिला नाही, तर तो सामाजिक अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवणारा प्रतीकात्मक प्रश्न बनला. 1970 च्या दशकात दलित चळवळ आपल्या शिखरावर होती. दलित पँथरसारख्या संघटना आणि लिटिल मॅगझिन चळवळ यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा उभारला होता. सामनाच्या या प्रश्नाने दलित चळवळीला  मुख्य प्रवाहातील मध्यमवर्गीय सांस्कृतीकडून पाठबळ दिले किंवा किमान जाणीव दिली. आणि दडपशाहीखालील समाजाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे बळ पुरवले.

1975 साली प्रदर्शित झालेला सामना हा मराठी चित्रपट आजही त्याच्या गहन सामाजिक आणि राजकीय भाष्यामुळे चर्चेत आहे. विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून साकारलेला, रामदास फुटाणे ह्यांची निर्मिती असलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारण, सहकार चळवळीतील भ्रष्टाचार आणि बहुसंख्य समाजाच्या वर्चस्ववादी मानसिकतेवर तीक्ष्ण प्रहार करतो. बहुसंख्य समाजाच्या राजकीय आणि सामाजिक प्रभावाखालील सहकार चळवळीच्या अपयशाची कहाणी सांगणारा हा चित्रपट तत्कालीन सामाजिक वास्तवाचे तटस्थ विश्लेषण करतो.

मी जन्म 1989 मध्ये घेतला, आणि साधारणतः 2000-2004 या काळात हा चित्रपट पाहिला तेव्हा सहकारी चळवळीचा प्रभाव कमी होत होता, परंतु या चळवळीचे बीज पेरणाऱ्या नेत्यांचे वारसदार मात्र राजकीय आणि सामाजिक सत्तेचा उपभोग घेत होते. 

सामना हा चित्रपट मराठा-केंद्रित सत्तेची आणि नेतृत्वाची टीका करणारा पहिला सांस्कृतिक आघात होता, मराठेतर राजकारणाचा सांस्कृतिक पाया तयार करण्यात ह्या चित्रपटाने मोलाची भर घातली आणि त्याने सहकारी चळवळीच्या अंधाऱ्या बाजूला उघड केले. हा चित्रपट प्रामुख्याने पुरुषप्रधान आहे, कारण त्या काळातील मुख्य प्रवाहात राजकारणात महिलांना फारशी जागा नव्हती. त्यांना केवळ घरगुती कामे आणि कुटुंबवृद्धी यापुरते मर्यादित ठेवले गेले होते. गांधीवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या पिढीच्या नेतृत्वानंतर निराश झालेल्या समाजसेवकांच्या मानसिकतेचे चित्रणही या चित्रपटात आहे. हा चित्रपट राजकारण, समाज आणि संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकतो आणि सहकाराने जनतेचा विश्वास गमावला आणि समाजाला लाभापेक्षा लुबाडणूकच जास्त दिली, याची जाणीव करून देतो.

सामनाची कथा बहुसंख्य समाजाच्या ग्रामीण भागातील राजकीय गटबाजी आणि सत्तेच्या खेळाभोवती फिरते. चित्रपटाची कथा मारुती कांबळे या व्यक्तिरेखेभोवती केंद्रित आहे, ज्याच्या गूढ गायब होण्यामुळे गावातील राजकीय आणि सामाजिक तणाव उफाळून येतो. 

“मारुती कांबळेचे काय झाले?” हा चित्रपटातला कळीचा प्रश्न तत्कालीन समाजात केवळ कथेचा भाग राहिला नाही, तर तो सामाजिक अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवणारा प्रतीकात्मक प्रश्न बनला. 1970 च्या दशकात दलित चळवळ आपल्या शिखरावर होती. दलित पँथरसारख्या संघटना आणि लिटिल मॅगझिन चळवळ यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा उभारला होता. सामनाच्या या प्रश्नाने दलित चळवळीला मुख्य प्रवाहातील मध्यमवर्गीय संस्कृतीकडून पाठबळ मिळवून दिले किंवा किमान जाणीव निर्माण केली. आणि दडपशाहीखालील समाजाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे बळ पुरवले.चित्रपटातील मारुती कांबळेचे गूढ गायब होणे हे दलित मागासवर्गीय समाजाच्या शोषणाचे आणि सत्ताधारी वर्गाकडून होणाऱ्या अन्यायाचे प्रतीक आहे. या प्रश्नाने सामान्य जनतेला सत्तेच्या संरचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रेरित केले, आणि दलित चळवळीच्या समकालीन लढ्याला एक सांस्कृतिक आधार प्रदान केला.

हिंदुराव धोंडे (निळू फुले) आणि मास्तर (श्रीराम लागू) या दोन प्रमुख व्यक्तिरेखांमधील तणावपूर्ण सामना हा चित्रपटाचा गाभा आहे. हिंदुराव धोंडे हा एक प्रभावशाली, सत्तालोलुप आणि भ्रष्ट सहकारी साखर कारखान्याचा नेता आहे, तर मास्तर हा एक आदर्शवादी, गांधीवादी विचारसरणीचा समाजसेवक आहे, जो हिंदुरावच्या भ्रष्ट कारवायांना आव्हान देतो. या दोघांमधील वैचारिक आणि नैतिक संघर्ष हा चित्रपटाला खोल अर्थ प्रदान करतो.

सहकारी चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील ग्रामीण विकासाचा कणा मानली गेली. 1947 नंतर भारत सरकारने सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले, जेणेकरून आर्थिक सत्ता विकेंद्रित होऊन सामान्य लोकांना विकास प्रक्रियेत सहभागी होता येईल. परंतु, सामना दाखवून देतो की, ही चळवळ काही नेत्यांच्या हातात केंद्रित झाली आणि त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी तिचा गैरवापर केला. सहकारी साखर कारखाने, जे शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी स्थापन झाले होते, ते काही नेत्यांच्या सत्तेचे आणि संपत्तीचे साधन बनले.‘सामना’ ने भ्रष्टाचाराला आणि सत्तेच्या गैरवापराला उघड केले, जे वर्चस्ववादी मानसिकतेचे प्रतीक होते.

चित्रपटातील पुरुषप्रधान दृष्टिकोन हा त्या काळातील सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे. महिला व्यक्तिरेखा,आणि त्यांचे चित्रण त्या काळातील लिंगभेदी  शोषक मानसिकतेचे द्योतक आहे. हिंदुराव धोंड्याच्या पत्नीचे पात्र असो वा इतर महिला, त्यांना राजकीय किंवा सामाजिक निर्णयप्रक्रियेत फारसा सहभाग नाही. हा पुरुषप्रधान दृष्टिकोन चित्रपटाला एका विशिष्ट सामाजिक संदर्भात बांधतो, परंतु त्याचवेळी तो त्या काळातील लिंगभेदी वास्तवावरही प्रकाश टाकतो. हा चित्रपट महिलांच्या ठाशीव अनुपस्थितीमुळे एका अर्थाने अपूर्ण आहे, परंतु तो त्या काळातील सामाजिक संरचनेचे प्रामाणिक चित्रण करतो.

‘सामना’ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गांधीवादी विचारसरणी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील समाजसेवकांच्या निराशेचे चित्रण. मास्तर हे पात्र गांधीवादी आदर्शांचे प्रतीक आहे, परंतु त्याला हिंदुरावसारख्या भ्रष्ट नेत्यांशी सामना करताना आपली नैतिकता आणि आदर्श टिकवणे कठीण जाते. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या पिढीच्या नेत्यांचे निधन झाल्यानंतर, अनेक समाजसेवक आणि आदर्शवादी व्यक्तींना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेने निराश केले. ‘सामना’ मधील मास्तर हे अशा निराश समाजसेवकांचे प्रतीक आहे, ज्यांना सत्तेच्या खेळात आपले आदर्श गमवावे लागले. चित्रपटातील संवाद आणि अभिनय यांच्या ताकदीमुळे हे वैचारिक संघर्ष अधिक गहनतेने समोर येतात.

‘सामना’ हा चित्रपट केवळ राजकीय आणि सामाजिक टीकाच करत नाही, तर तो जनतेला सहकारी चळवळीच्या अपयशाबद्दल आणि दलित समाजाच्या शोषणाबद्दल जागरूक करतो. सहकारी चळवळीने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा आणि सामान्य लोकांचा विश्वास गमावला. या चळवळीच्या नावाखाली झालेल्या लुबाडणुकीमुळे समाजाला लाभापेक्षा नुकसानच जास्त झाले. चित्रपटातील हिंदुराव धोंडे हे पात्र अशा भ्रष्ट नेत्यांचे प्रतीक आहे, ज्यांनी सहकारी चळवळीचा वापर आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला. मारुती कांबळेच्या गायब होण्याचा प्रश्न आणि त्याने निर्माण केलेली चर्चा यांनी दलित चळवळीला सांस्कृतिक पाठबळ दिले.

‘सामना’ हा चित्रपट सामान्य जनतेला सहकारी चळवळीच्या अंधाऱ्या बाजूबद्दल आणि सामाजिक अन्यायाबद्दल जागरूक करणारा एक प्रबोधनात्मक प्रयत्न आहे. हा चित्रपट मराठी सिनेमातील एक मैलाचा दगड आहे. विजय तेंडुलकर यांच्या तीक्ष्ण लेखनाने आणि निळू फुले, श्रीराम लागू यांच्या दमदार अभिनयाने हा चित्रपट आजही पाहण्यासारखा आहे. राजकीय वर्चस्वावर, सहकारी चळवळीच्या अपयशावर आणि दलित समाजाच्या शोषणावर तटस्थपणे भाष्य करणारा हा चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासात एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सत्तेचा आणि आदर्शांचा गैरवापर कसासमाजाच्या विश्वासाला तडा देतो आणि सामान्य माणसाला कसे लुबाडतो याबाबत हा चित्रपट समाजाला जागरूक करतो आणि आणि दडपलेल्या समाजाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची प्रेरणा देतो.

- केतनकुमार पाटील
ईमेल : Ketankumarupsc@gmail.com
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

Tags: जब्बार पटेल विजय तेंडुलकर रामदास फुटाणे श्रीराम लागू निळू फुले मराठी चित्रपट चित्रपट सिनेमा केतनकुमार पाटील राजकीय सिनेमा मराठी सिनेमा सामना 50 सामनाची पन्नास वर्षे Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/