बिजापूर डायरी या पुस्तकात नव्याने समाविष्ट केलेले प्रकरण : बस्तर सोडताना

हे संपूर्ण पुस्तक लेखिकेच्याच आवाजात ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध आहे.

छत्तीसगडमधील दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागात स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारलेली डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांची 'बिजापूर डायरी' ही लेखमाला 2018-19 या वर्षभरामध्ये साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये त्या लेखमालेचे त्याच नावाने पुस्तकही प्रकाशित झाले. त्याच वर्षी त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला दिला जातो. तसेच या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण युवा लेखक (2021) हा मानाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. प्रामाणिक निवेदन, विलक्षण अनुभव आणि लेखिकेची डोळ्यासमोर प्रसंग जिवंत करण्याची लेखनशैली यामुळे हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. 

या पुस्तकाचे ऑडिओबुक खुद्द लेखिकेच्याच आवाजात 2019 मध्ये स्टोरीटेलवर प्रसिद्ध झाले आहे. या वर्षी जून महिन्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. आणि या आवृत्तीमध्ये 'बस्तर सोडताना' हा लेख नव्याने समाविष्ट केला आहे. त्या लेखाचा ऐश्वर्या यांच्या आवाजातील हा 16 मिनिटांचा ऑडिओ. 


हे संपूर्ण पुस्तक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पुस्तक छापील किंवा इ-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: audiobooks marathi storytel marathi naxalite gadchiroli arban naxal marathi books award winning books audio ayshwarya rewadkar sadhana prakashan Load More Tags

Comments:

Yogesh Raut

खुप मेहनत घेतली डॉ. येश्र्वर्या मॅडम नी सर्वात पहले मॅडमचे खूप खूप अभिनंदन. आज कल सामान्य आदिवासी माणसांना नक्षलवादी मनून ठार मारल्या जात आहे आणि न्यूज, newspaper मधे वेगळीच न्यूज आपल्या समोर दाखवली जातात.

Add Comment