आदिवासी भागात आरोग्यसेवा द्यायची हा ध्येयवाद घेऊन डॉ. ऐश्वर्या रेवडकर ही स्त्रीरोगतज्ञ तरूणी छत्तीसगड राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा बिजापूर येथील जिल्हा रूग्णालयात 2017 मध्ये दाखल झाली. तिथे काम करताना तिला रूग्णालयात व परिसरात वावरताना जे काही अनुभव आले, त्याचे चित्रण करणारी तिची लेखमाला 2018 मध्ये साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. ती लेखमाला नंतर ऑगस्ट 2019 मध्ये साधना प्रकाशनाकडून पुस्तकरुपाने आली. या पुस्तकातील प्रामाणिक निवेदन, विलक्षण अनुभव आणि लेखिकेची डोळ्यासमोर प्रसंग जिवंत करण्याची लेखनशैली यामुळे पुस्तक वाचकप्रिय ठरले.
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा ललित गद्य लेखनासाठीचा ताराबाई शिंदे स्मृती पुरस्कार (2019) देण्यात आला. (हा पुरस्कार लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला दिला जातो.) तसेच या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण युवा लेखक (2021) हा मानाचा पुरस्कारसुद्धा मिळाला.
मुद्रित आवृत्तीसोबतच हे पुस्तक ई-बुक स्वरूपात किंडलवर उपलब्ध आहे. आणि आता ते लेखिकेच्याच आवाजात ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर आले आहे. त्यातील हे एक प्रकरण. एकूण सात तासांचे हे संपूर्ण पुस्तक ऐकता येईल, मात्र त्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.
Tags: audiobooks marathi storytel marathi naxalite gadchiroli urban naxal marathi books award winning books audio ayshwarya rewadkar sadhana prakashan Load More Tags
Add Comment