साधना साप्ताहिकाच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील यांच्या साहित्यावरील एक दिवसीय चर्चासत्र 16 ऑगस्ट 2024 रोजी पार पडले. एकूण चार सत्रांमध्ये मिळून दहा वक्त्यांनी बोकील यांच्या ललित आणि ललित वैचारिक साहित्याविषयी विविध अंगांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. मिलिंद बोकील यांच्या दीर्घ मुलाखती असलेला साधनाचा वर्धापनदिन विशेषांक यावेळी प्रसिद्ध झाला. तसेच बोकील यांच्या 'गोष्ट मेंढा गावाची' या पुस्तकाची सुधारित व वाढवलेली आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आली. यथावकाश या संपूर्ण चर्चासत्राचा व्हिडिओ साधनाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध होईलच. मात्र याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून मिलिंद बोकील यांच्या साहित्याच्या संदर्भातील काही अन्य मान्यवरांचे लेख तसेच व्हिडिओज कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हा पहिला व्हिडिओ. पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी बोकील यांच्या साहित्यातून दिसणारे पर्यावरण या विषयावर टाकलेला दृष्टिक्षेप.
हेही वाचा :
‘चिद्गगनाचे भुवनदिवे’- लेखकाच्या भावविश्वातील दीप्ती - डॉ. नीलिमा गुंडी
Translating Milind Bokil's Shala - Vikrant Pande
Tags: sadhana digital milind bokil atul deulgaonkar literature environment मिलिंद बोकील अतुल देऊळगावकर साधना डिजिटल पर्यावरण साहित्य मिलिंद बोकील यांचे साहित्य Load More Tags
Add Comment