स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (दुसऱ्या प्रकरणातील निवडक भाग)

साडेसहा तासांचे हे ऑडिओबुक गजानन परांजपे यांच्या आवाजात स्टोरीटेलवर उपलब्ध झाले...

जागतिक कीर्तीचे कृषी वैज्ञानिक एम.एस. स्वामीनाथन यांना 7 ऑगस्ट 1925 ते 28 सप्टेंबर 2023 असे 98 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांची अभ्यासपूर्ण आणि ललितरम्य पद्धतीने ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे अतुल देऊळगावकर लिखित, 'स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास'. मागील दोन दशकांत हे पुस्तक छापील स्वरूपात उपलब्ध होते. पण आता हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपात 'स्टोरीटेल'वर उपलब्ध करून दिले आहे. प्रसिद्ध नाट्य अभिनेते गजानन परांजपे यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

अर्थातच, छापील पुस्तकाचे ऑडिओ बुक करताना आवश्यक तिथे संक्षिप्त केले आहे. स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन असेल तर हे संपूर्ण ऑडिओ बुक ऐकता येईल.

एकूण साडेसहा तासांच्या या ऑडिओ बुकमध्ये, सात प्रकरणे आहेत.

1. भारताला भरवणार कोण ?
2. भिक्षापात्र अवलंबिणे
3. शेतच प्रयोगशाळा
4. विश्वाच्या अंगणात
5. ज्ञानाधारित शेती आणि विकास
6. स्वामीनाथन यांची मुलाखत
7. शेतकरी आयोगाचे काय करायचे ?

स्वामीनाथन यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या चालू आहे आणि परवा त्यांचा पहिला स्मृती दिवस येऊन गेला, त्या निमित्ताने हे ऑडिओ बुक उपलब्ध केले आहे. अर्थातच, छापील पुस्तकही साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेले असून, ते विक्रीसाठी साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर आणि अमेझॉनवरही उपलब्ध आहे..!

- संपादक, साधना


संपूर्ण ऑडिओ बुक ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... https://storytel.com


छापील पुस्तक मागवण्यासाठी साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या.. 

 

Tags: marathi books agriculture m s swaminathan atul deulogaonkar sadhana digital audiobooks Load More Tags

Add Comment