‘भटकभवानी’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखिका समीना दलवाई यांच्याशी गप्पा...

गेल्या 10 ते 12 वर्षांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील 45 लेखांचा हा संग्रह आहे.

जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनीपत येथे प्राध्यापक राहिलेल्या समीना दलवाई यांची ‘बाबरी मस्जिद, 25 इयर्स ऑन’ (2017) आणि ‘बॅन्स ॲड बारगर्ल्स : परफॉर्मिग कास्ट इन मुंबईज् डान्स बार्स’ (2019) ही दोन इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांचे ‘भटकभवानी’ हे मराठी पुस्तक हरिती प्रकाशनाकडून आले आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांच्या काळात अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर मराठीतील विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या 45 लेखांचा हा संग्रह आहे. 176 पानांचे हे पुस्तक एकूण 10 भागांत विभागले आहे. माणदेशी फौंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या माणदेशी चॅम्पियन्स या उपक्रमाचे संस्थापक प्रभात सिन्हा यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने लेखिकेशी साधलेला संवाद.   

Tags: भटक भवानी नवे पुस्तक साहित्य लेख संग्रह सामाजिक सांस्कृतिक Load More Tags

Comments:

Shamsuddin

हे पुस्तक मी मागवले आहे. संपूर्ण पुस्तक वाचले नाही. मात्र हमीद दलवाई यांच्या संदर्भात लिहिलेल्या लेखात लेखिकेने हमीद दलवाई आणि साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या विषयी केलेले मतप्रदर्शन पटले नाही.

Ujwala Mehendale

मला मुलाखत खूप आवडली ्् मुस्लिम स्त्रियांबद्दल त्यांची एक दोन निरिक्षणे मला पटली नाहीत. पण हे पुस्तक तर मला नक्कीच हवे आहे. मला ते कसे मिळेल ?

Anand Gosavi

खूप छान मुलाखत. पुस्तकाबद्दल आउत्सुक्य आणि लेखिकेबद्दल आदर निर्माण करणारी....

Add Comment