ऑडिओ - हुर्मुजी रंगाचा उंच मोती-दाणा

साधना साप्ताहिकाच्या दिवाळी अंकातील हा दीर्घलेख आता लेखकाच्याच आवाजात 'स्टोरीटेल'वर उपलब्ध आहे. 

1939 ते 2020 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले स्वामी अग्निवेश हे आर्य समाजातील नेते आणि वेठबिगार कामगारांचे नेते म्हणून सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीला आले. मात्र नंतरच्या अर्धशतकात त्यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळीं व आंदोलने यामध्ये सहभाग घेतला वा पाठिंबा दिला. त्यांच्याशी विनय हर्डीकर यांचा आलेला संबंध साधारणतः दशकभर इतका अल्प, पण अधिक जवळचा होता.. त्यातून हर्डीकर यांना स्वामी अग्निवेश यांच्या व्यक्तिमत्वाचा जो परिचय झाला तो अतिशय रोचक व रोमांचक पद्धतीने या लेखात उतरला आहे.. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा अशा प्रकारचा लेख भारतातील अन्य कोणत्याही भाषेत क्वचितच लिहिला गेला असेल.. स्वामीजींचे निधन झाले तेव्हा, हा लेख साप्ताहिक साधनाच्या 2020 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. मुळात हे रेकॉर्डिंग आधी करण्यात आले आणि नंतर त्याचे शब्दांकन करून लेख तयार केला गेला. साधना साप्ताहिकाच्या अर्काईव्हवर हा लेख उपलब्ध आहे. 

हा संपूर्ण लेख आता Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. संपूर्ण ऑडियो बुक दोन तास पंचावन्न मिनिटांचे असून त्यातील 15 मिनिटांचा भाग इथे सादर करीत आहोत.

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: स्वामी अग्निवेश बंधुआ मुक्ती मोर्चा शरद जोशी मेधा पाटकर शंकर गुहा नियोगी vinay hardikar swami agnivesh sharad joshi bandhua mukti morcha medha patkar shankar guha niyogi Load More Tags

Add Comment