साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी बापट आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.
चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक विनय हर्डीकर यांनी बीजभाषण केले. बापटांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेकविध पैलूंकडे लक्ष वेधतानाच काहीएक राजकीय, सामाजिक, वैचारिक आणि तात्त्विक बांधिलकी स्वीकारून सेवादलात कार्यरत असणाऱ्या बापटांची ती बांधिलकी त्यांच्या रसिकतेच्या आणि मुक्त निर्मितीच्या आड कधीही आली नाही हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.
हेही पाहा : वसंत बापट यांच्या शिंग फुंकिले रणी, तेजसी, शतकाच्या सुवर्णमुद्रा आणि जिंकुनि मरणाला या चार पुस्तकांच्या नव्या आवृत्यांचे प्रकाशन आणि माधवी वैद्य दिग्दर्शित वसंत बहार या 23 मिनिटांच्या माहितीपटाचे प्रदर्शन.
प्रमुख पाहुणे : माधवी वैद्य आणि संतोष पद्माकर पवार
अध्यक्ष : विनय हर्डीकर
दि : 23 जुलै 2022
Tags: साहित्य अकादमी साधना ट्रस्ट वसंत बापट चर्चासत्र कवी विनय हर्डीकर राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साने गुरुजी गोळवलकर राजकीय बांधिलकी political commitment sahitya academy vinay hardikar speech vasant bapat marathi poetry Load More Tags
Add Comment