ऑडिओ : अँथनी ट्रोलॉप - गोविंद तळवलकर

‘डिकन्स आणि ट्रोलॉप’ हे पुस्तक आता स्टोरीटेलवर उपलब्ध

इंग्लंडच्या वाङ्मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत. शेक्सपिअर पहिल्या एलिझाबेथच्या युगाचा. एकोणिसाव्या शतकातले वाङ्मय राणी व्हिक्टोरियाच्या युगाचे मानले जाते. व्हिक्टोरियाचा जन्म 1819 चा. तिच्याकडे राज्यपद आले 1837 मध्ये आणि ते चालले 1900 पर्यंत. या कालखंडातील वाङ्मयाची काही सर्वमान्य वैशिष्ट्ये आहेत. या काळाचे प्रतिनिधी असण्याचा मान चार लेखकांना मिळतो. चार्लस् डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम थॅकरे आणि अँथनी ट्रोलॉप. यांपैकी डिकन्सचे द्विजन्मशताब्दी वर्ष 2012 मध्ये तर ट्रोलॉपचे द्विजन्मशताब्दी वर्ष 2015 मध्ये येऊन गेले. त्या निमित्ताने गोविंद तळवलकर यांनी लिहिलेल्या दोन दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे.

साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर आले असून, गजानन परांजपे यांनी त्याचे वाचन केले आहे. या पुस्तकातील ट्रोलॉपवरील लेखाचा हा 18 मिनिटांचा निवडक अंश. पावणेतीन तासांचे हे संपूर्ण पुस्तक स्टोरीटेलवर ऐकता येईल, मात्र त्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. 

साधना प्रकाशनाचे हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. 

Tags: नोबेल नवे पुस्तक मराठी साहित्य गोविंदराव तळवलकर व्हिक्टोरियन इंग्लिश ऑडीओ Load More Tags

Add Comment