आपल्यापुढच्या प्रश्नांची गंभीर चर्चा करणारे लेख मला वाचायला आवडतात

माझे वाचन - संपूर्ण भाषण

‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादकपद तब्बल 29 वर्षे भूषविलेल्या गोविंदराव तळवलकर यांचे महाराष्ट्रातील दोन-तीन पिढ्यांना तरी इंग्रजी वाचनाकडे वळवण्यात मोठे योगदान आहे. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. 2007 च्या सुरुवातीला ते दोन महिन्यांसाठी भारतात आले होते, तेव्हा 23 एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने, साधनाच्या साने गुरुजी सभागृहात 'माझे वाचन' या विषयावर त्यांचे भाषण झाले होते. ते भाषण शब्दांकन करून साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केले होते. 

साधना साप्ताहिकात छापले गेलेले हे भाषण आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर आले असून, गजानन परांजपे यांनी त्याचे वाचन केले आहे. त्यातील एक निवडक अंश यापूर्वी कर्तव्य-साधनावर प्रसिद्ध झालेला आहे. गोविंदरावांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्ताने हे संपूर्ण भाषण ऑडिओ प्रसारित करत आहोत. पाउण तासाचे हे संपूर्ण पुस्तक स्टोरीटेलवर ऐकता येईल, मात्र त्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.


हेही ऐका : 

ऑडिओ : चार्लस् डिकन्स - गोविंद तळवलकर
ऑडिओ : अँथनी ट्रोलॉप - गोविंद तळवलकर

Tags: गोविंद तळवलकर Load More Tags

Add Comment

संबंधित लेख