भगतसिंग, बोस, नेहरू 

भगतसिंग यांच्या 92व्या स्मृतिदिनानिमित्ताने...

दिल्लीत 2014 ला सत्तापालट झाला आणि त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी व सरदार पटेल यांना आपल्या गोटात घेऊन टाकले आणि पंडित नेहरूंना वाळीत टाकण्याचे धोरण अवलंबिले. इंग्रजांशी शस्त्रास्त्रांनी दोन हात करणारांना मानाचे स्थान देण्याचा कटाक्ष या सरकारचा आहे. यामुळे भगतसिंग आणि सुभाषबाबू यांना समानधर्मी मानले जात असल्यास नवल नाही. त्या दोघांना मान देणे योग्यच आहे. पण भगतसिंग व सुभाषबाबू हे समानधर्मी मानायचे का, हा प्रश्न आहे. कारण यासंबंधात पूर्वी कोण काय बोलले व आता काय बोलले जाते यात गुंतून राहण्यापेक्षा स्वत: भगतसिंग व सुभाषबाबू एकमेकांसंबंधात काही बोलले होते काय, हे पाहणे अधिक योग्य. 

23 मार्च हा भगतसिंग यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 8 ऑक्टोबर 2016 च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला गोविंद तळवलकर यांचा 'भगतसिंग, बोस, नेहरू' हा लेख कर्तव्यवरून ऑडिओ स्वरूपात भेटीला आणत आहोत. 20 मिनिटांच्या या लेखाचे वाचन केले आहे गजानन परांजपे यांनी.


स्टोरीटेलवर गोविंद तळवलकर यांची पुस्तके ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेली गोविंद तळवलकर यांची छापील पुस्तके खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: Bhagat Singh Javaharlal Neharu Subhashchandra Bose Load More Tags

Add Comment