अलौकिक यश कसे मिळवावे हे सांगताहेत स्वामी विवेकानंद

4 जुलै : स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त

मराठीत आगळीवेगळी शैली आणि आगळे वेगळे विषय यासाठी प्रसिद्ध असलेले दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विज्ञानातील संशोधनाच्या क्षेत्रांतून निवृत्ती घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद हे आपल्या अभ्यासाचे मुख्य क्षेत्र बनवले. त्यांना समजलेले विवेकानंद अर्थातच आगळे वेगळे होते. ते सांगण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने दिली. त्याच प्रक्रियेतून त्यांनी 'शोध स्वामी विवेकानंदांचा' आणि 'विवेकानंदांची खरी ओळख' ही दोन पुस्तके लिहिली. ती प्रचंड लोकप्रिय झाली, त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मात्र नव्या पिढीला लवकरच, म्हणजे कुमार व युवा कालखंडातच विवेकानंद समजले पाहिजेत म्हणून त्यांनी 'मुलांसाठी विवेकानंद' हे पुस्तक लिहिले. फेब्रुवारी 2022 मध्ये साधना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आणि एप्रिल 2023 मध्ये या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आलेली आहे. लवकरच हे पुस्तक ऑडिओबुक स्वरूपात अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात 'स्टोरीटेल'वर येत आहे.

12 जानेवारी 1863 ते 4 जुलै 1902 असे 39 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंदांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने, लवकरच येऊ घातलेल्या या ऑडिओबुकमधील हे पहिले प्रकरण प्रसिद्ध करत आहोत.

साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून हे पुस्तक छापील स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

साधनाची सर्व ऑडिओबुक्स 'स्टोरीटेल'वर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: स्वामी विवेकानंद दत्तप्रसाद दाभोळकर गौरी देशपांडे साधना ऑडिओबुक स्टोरीटेल पुस्तक बालवाङ्मय Load More Tags

Add Comment