सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकात 'बेकस' या कुर्दिश भाषेतील इराकी चित्रपटावर सुहास पाटील यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.
'बेकस' या सिनेमाविषयी...
डाना दूर पाहत काहीतरी विचार करत उभा असतो. झाना अजूनही नुकत्याच पाहिलेल्या सिनेमातल्या सुपरमॅनच्या धुंदीत असतो. आणि हात आडवे पसरून इकडे तिकडे पळत असतो. तो डानाजवळ येतो आणि त्याला विचारतो, ‘‘तू काय पाहतो आहेस?’’ ‘अमेरिका,’ डाना उत्तर देतो. तो झानाला सांगतो, ‘‘अमेरिका हा खूप मोठा देश आहे. तिथे खूप मोठ्या इमारती आहेत. सिनेमात पाहिलेला तो सुपरमॅनही अमेरिकेत राहतो. आणि आपण सुपरमॅनला भेटायला अमेरिकेला जायला हवं.’’ झानाला ही कल्पना फारच आवडते. पण अमेरिकेला कसं जाणार?
साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला
साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला
Tags: बालकुमार दिवाळी बालकलाकार बालचित्रपट सिनेमा कुर्दिश आंतरराष्ट्रीय फिल्म्स लहान मुलांसाठीचे चित्रपट Load More Tags
Add Comment