पुणे ते पॅरिस व्हाया दिल्ली

'पक्षी उन्हाचा' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीनिमित राजन हर्षे यांची मुलाखत (भाग 1/2)

अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजन हर्षे यांची 12 दीर्घ लेखांची मालिका साधना साप्ताहिकात 2022- 23  मध्ये प्रसिद्ध झाली, नंतर त्या लेखमालेचे पुस्तक "पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात" या नावाने डिसेंबर 2023 मध्ये साधना प्रकाशनाकडून आले.

या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असताना, त्यांची दोन भागांतील दीर्घ  मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली. साधना साप्ताहिकाच्या ऐवज व्हिडिओ मालिकेअंतर्गत घेतलेल्या या मुलाखतीच्या पूर्वार्धामध्ये डॉ. हर्षे यांचा "पुणे ते पॅरिस व्हाया दिल्ली" आणि उत्तरार्धामध्ये "दिल्ली ते दिल्ली व्हाया हैदराबाद - अलाहाबाद" हा प्रवास आला आहे.  या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील विद्यार्थी, प्राध्यापक , अभ्यासक, संशोधक व प्रशासक या पाच टप्प्यांवर दृष्टीक्षेप टाकला आहे. त्यातील हा पूर्वार्धाचा एक तासाचा व्हिडिओ.

Tags: राजन हर्षे पक्षी उन्हाचा दुसरी आवृत्ती पक्षी उन्हाचा ऐवज विनोद शिरसाठ Load More Tags

Add Comment

संबंधित लेख