1907 ते 93 असे 85 वर्षांचे आयुष्य लाभलेले नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांची प्रमुख ओळख समाजवादी नेते अशी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 1942 च्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. नंतर त्यांनी पुणे शहराचे महापौर, पुणे मतदार संघातून लोकसभा सदस्य आणि ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते साधना साप्ताहिकाचे संपादकही होते. मात्र या व्यतिरिक्त त्यांची एक महत्त्वाची ओळख म्हणजे, मराठीतील अतिशय शैलीदार लेखक! वैचारिक व ललित साहित्य त्यांनी विपुल प्रमाणात लिहिले आणि महत्वाच्या पुस्तकांचे अनुवादही केले. दोन डझन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अशा या नानासाहेबांचे स्वतःच्या आयुष्याचे विहंगमावलोकन करणारे चिंतन म्हणजे 'तिमिरातुनी तेजाकडे' हा दीर्घ लेख..! 1987 मध्ये नानासाहेबांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली तेव्हा त्यांनी लिहिलेला हा लेख साधना प्रकाशनाकडून आलेल्या त्यांच्या नारायणीय या पुस्तकात आहे.
गजानन परांजपे यांच्या आवाजात ऑडिओबुक स्वरुपात हा लेख स्टोरीटेलवर आला आहे. त्यातील हा 50 मिनिटांचा निवडक भाग. एकूण दीड तासांचे हे संपूर्ण ऑडिओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.
साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून नारायणीय हे पुस्तक खरेदी करता येईल.
Tags: समाजवादी ललित तिमिरातून तेजाकडे मराठी पुस्तके निबंध Load More Tags
Add Comment