हिटलरचा फॅन असलेला जोजो

2017 ते 2022 या सहा वर्षांतल्या साधना बालकुमार अंकांतील 34 लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकातील 'जोजो रॅबिट' या इंग्रजी भाषेतील अमेरिकन चित्रपटावर मृद्‌गंधा दीक्षित यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'जोजो रॅबिट' या सिनेमाविषयी...

एक ससा जोजोच्या हातात दिला जातो. मान मुरगळून सशाला मारून टाकण्याची परीक्षा असते. त्या सशाकडं बघून जोजोला दया येते. जोजो त्याला जमिनीवर ठेवून पळून जायला सांगतो. पण ते सैनिक सशाला पकडतात आणि त्याची मान मुरगळून फेकून देतात. जोजोला म्हणतात, ‘‘तू या सशासारखा भित्रा आहेस. तू जोजो रॅबिटच आहेस.’’ आणि मग सगळे ‘जोजो रॅबिट, जोजो रॅबिट’ असे म्हणत त्याला चिडवतात. जोजो रुसतो. एकटाच झाडांच्या मध्ये जाऊन बसतो. तिथं त्याचा ॲडॉल्फ त्याची समजूत काढतो.


साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...


साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला 


साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला 


 

Tags: Balkumar Sadhana Balkumar Diwali 2022 साधना बालकुमार दिवाळी लहान मुलांसाठीचे चित्रपट बालचित्रपट जोजो रॅबिट मृद्गंधा दीक्षित Load More Tags

Add Comment