मुस्लीम समाजातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेला 22 मार्च, 2020 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात मंडळाने जुबानी तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या परंपरांना विरोध केला, तसेच समान नागरी कायद्याचा आग्रह धरला. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जुबानी तीन तलाकवर बंदी घातली आणि मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सुधारणेचा एक टप्पा यशस्वीपणे पार झाला. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या मुस्लीम समाजातील इतर प्रश्नांवरही आता साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे.
जुबानी तीन तलाकचा प्रश्न निकाली निघावा म्हणून मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष मेहबूब कादरी उर्फ सय्यदभाई यांनी मंडळाच्या स्थापनेपासून स्वतःला या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. या निमित्ताने 'साप्ताहिक साधना' चे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा हा चौथा भाग...
Tags: मुस्लीम मुसलमान इस्लाम तीन तलाक मोदी नरेंद्र मोदी हमीद दलवाई मुस्लीम सत्यशोधक मंडळ पद्मश्री समान नागरी कायदा समाज सुधारक Hamid Dalwai Muslim Islam Musalman Teen Talaq Narendra Modi Modi Modi and Muslims Hamid Dalwai Muslim Satyashodhak Mandal Padmashree Uniform Civil Code Muslim Reform Movement Social Reform Load More Tags
Add Comment