भूगोल म्हणजे काय?

साधना बालकुमार दिवाळी अंक 2024

सहा विषयांवरील सहा तज्ज्ञांचे ललितरम्य लेख ही 2024च्या साधना बालकुमार दिवाळी अंकाची थीम आहे. त्या त्या विषयाचा गाभा व आवाका सांगणारे आणि वाचकांचे क्षितीज रुंदावणारे हे लेख आहेत.

1. समाजशास्त्र म्हणजे काय : मिलिंद बोकील
2. मानसशास्त्र म्हणजे काय : आनंद नाडकर्णी
3. भूगोल म्हणजे काय : संकल्प गुर्जर
4. जीवशास्त्र म्हणजे काय : सरोज घासकडबी
5. भौतिकशास्त्र म्हणजे काय : विवेक सावंत
6. रसायनशास्त्र म्हणजे काय : अरविंद नातू

प्रत्येक विषय अन्य अनेक विषयांना कुठे, किती व कसा भिडलेला असतो याची झलक या लेखांतून मिळेल. आणि प्रत्येक विषयात अभ्यास व संशोधन करून व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी किती प्रचंड वाव आहे हेही कळेल. आपल्या शिक्षणव्यवस्थेत थिअरी व प्रॅक्टिकल आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास यांच्या संदर्भात सदैव वाद-संवाद होत असतात. हे ऑडिओ बुक त्यासाठी उत्तम खाद्य पुरवेल.

Tags:Load More Tags

Comments:

Navanath londhe

मानसशास्त्रासह सर्व भूगोल ,रसायनशास्त्र इ. विषयाचे तोंड ओळख याचवयात होण,हे महत्त्वाचा आहे .आणि ते तुम्ही या अंकातून केलेला आहे. त्यामुळे भारताचे उद्याचे नागरिक सामाजिक राजकीय दृष्ट्या सुदृढ निर्माण होतील .अशी खात्री आहे. संपादक साहेब सर्व लेखकांच मनःपूर्वक अभिनंदन.

Add Comment