दंतकथा या लघुकादंबरीतील एक प्रकरण

भारत सासणे अनुवादित दंतकथा ही लघुकादंबरी ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर आली आहे.

अब्दुल बिस्मिल्लाह हे हिंदी भाषेतील प्रथितयश लेखक. त्यांनी 1990 मध्ये लिहिलेली (हिंदी 'इंडिया टुडे' मध्ये क्रमशः प्रसिद्ध झालेली) 'दंतकथा' ही लघुकादंबरी म्हणजे एका कोंबड्याची आत्मकथा आहे. प्रत्यक्षात त्या कोंबड्याच्या आत्मकथेतून मानवी जीवनातील वर्तन-व्यवहाराचे अनोखे दर्शन घडते. या लघुकादंबरीचा अनुवाद मराठीतील प्रथितयश लेखक भारत सासणे यांनी केला आणि 2002 च्या साधना दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. नंतर तो पुस्तकरुपाने आला. या अनुवादासाठीची परवानगी मागताना सासणे यांनी बिस्मिल्लाह यांना पत्रात लिहिले होते, "ही कादंबरी तुम्ही लिहिली नसती तर मी लिहिली असती!" सासणे यांनी या एका वाक्यातून खूप काही सूचित केले आहे...!

मुद्रित आवृत्तीसोबतच ही लघुकादंबरी ई-बुक स्वरूपात किंडलवर उपलब्ध आहे. आणि आता ते गजानन परांजपे यांच्या आवाजात ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर आले आहे. त्यातील हा सुरुवातीचा काही भाग. एकूण दोन तासांचे हे संपूर्ण ऑडिओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.


साधना प्रकाशनाची सर्व पुस्तके खरेदी करण्यासाठी भेट द्या www.sadhanaprakashan.in या वेबसाईटला..

Tags: urdu books translated into marathi bharat sasne abdul bismillah marathi audiobooks kindle storytel sadhana prakashan gajanan paranjape Load More Tags

Comments:

Bajirao khule

Like audio story

Add Comment