प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान, प्रतिभावान व कर्तबगार या तिन्ही निकषांवर त्यांची गणना अव्वल स्थानी केली जाते.
अशा या सयाजीरावांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक ग्रंथ, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झालेले असून, आणखी 40 ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
असे हे सयाजीराव, बडोद्याच्या राजगादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने बाबा भांड यांची दीर्घ मुलाखत 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. प्रत्येकी एक तासाच्या चार भागांत ती प्रसिद्ध करीत आहोत. आपण या मुलाखतीच्या लिंक्स आपल्या मित्रपरिवाराला जरूर फॉरवर्ड करू शकता. Thanks..
- संपादक, साधना
Add Comment