ऑडिओ - 'सुंदर पत्रे' या पुस्तकातील एक पत्र

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 4

साने गुरुजींनी 10 जून 1949 ते 10 जून 1950 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून 45 लेख ‘सुंदर पत्रे’ या सदरात लिहिली. ती पत्रे जरी त्यांनी आपली प्रिय पुतणी सुधाला उद्देशून लिहिली असली तरी,  प्रत्यक्षात गुरुजींनी ही पत्रे महाराष्ट्रातील किशोरवयीन मुला-मुलींना समोर ठेवून लिहिली आहेत. त्यात हितगुज आहे, किशोरवयीन मुला-मुलींशी आणि स्वत:शीही. त्या पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि अर्थातच मानव्या विषयी व्यक्त होतात. त्यातील निवडक 20 सुंदर पत्रे आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आली असून त्यांचे वाचन केले आहे मृदगंधा दीक्षित आणि सुहास पाटील यांनी. या पुस्तकातील हे 17 मिनिटांचे एक पत्र ऐका सुहास पाटील यांच्या आवाजात. सहा तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. 

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक साने गुरुजी सुंदर पत्रे सुहास पाटील स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Sane Guruji Sundar Patre Suhas Patil Load More Tags

Comments:

Bandu Mohan Jadhav

Sane Guruji Patra

Bandu Mohan Jadhav

sane guruji che petra

Chirag

Ptra

Add Comment