ऑडिओ - संस्कृती म्हणजे काय? 

 'श्यामचा जीवनविकास' हे पुस्तक आता स्टोरीटेलवर उपलब्ध

24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड समजून घेण्यासाठी, त्यांनी स्वतः लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. त्यापैकी 'श्यामचा जीवनविकास' या पुस्तकात मॅट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्षे असा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे. पाच तासांचे हे संपूर्ण पुस्तक आता Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील हे बारा मिनिटांचे एक प्रकरण.  


हे ही ऐका 

साने गुरुजींच्या 'सुंदर पत्रे' या पुस्तकातील एक पत्र

साने गुरुजींच्या 'श्याम' या पुस्तकातील एक प्रकरण - माझा पहिला मुसलमान मित्र 


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक साने गुरुजी सुहास पाटील स्टोरीटेल श्यामचा जीवनविकास Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Sane Guruji Suhas Patil Shyamcha Jivanvikas Load More Tags

Add Comment