24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड समजून घेण्यासाठी, त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवनविकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. त्यापैकी 'श्याम' या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. म्हणजे वय वर्षे 10 ते 14 या काळातील गुरुजींचे भावविश्व, विचारविश्व, अनुभव आणि त्यावरील चिंतन हे सर्व ‘श्याम’मध्ये आले आहे. हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्याचे वाचन सुहास पाटील यांनी केले आहे. या पुस्तकातील 'माझा पहिला मुसलमान मित्र' हे 16 मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. सव्वा आठ तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.
साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक साने गुरुजी श्याम सुहास पाटील स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Sane Guruji Shyam Suhas Patil Load More Tags
Add Comment