ऑडिओ - सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ

1 नोव्हेंबर - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त...

1945 ते 2013 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज (1 नोव्हेंबर 2021) 76 वी जयंती. 1980 मध्ये 'सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ' हा लेख लिहिला तेव्हा ते 35 वर्षांचे होते. त्या वर्षी ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने 'संकल्प' हे पुस्तक प्रकाशित केले, त्यात विविध क्षेत्रांतील तरुण कार्यकर्त्यांचे अनुभवकथन करणारे लेख आहेत. त्या पुस्तकाचे संपादन केले आहे संजीव खांडेकर यांनी. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम सुरू केले 1985 नंतर, त्याच्या पाच वर्षे आधी लिहिलेला हा लेख आहे. म्हणजे अंनिस पूर्वी दाभोलकर काय करीत होते हे या लेखातून कळते. तर ऐका 'सामाजिक जीवनातील माझा सुरूवातीचा काळ' हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख हर्षल लवंगारे यांच्या आवाजात... 

या लेखासोबतच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 'लढे अंधश्रद्धेचे' या पुस्तकातील निवडक लेख Storytel वर उपलब्ध असून ते ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. 


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: मराठी ऑडिओबुक स्टोरीटेल डॉ. नरेंद्र दाभोलकर हर्षल लवंगारे Marathi Marathi Books Audiobooks Audio books Dr. Narendra Dabholkar Harshal Lavangare Storytel Load More Tags

Comments:

Jaya jaiswal

76 vi jayantichya hardik shubhecha...nice voice harshal sir...

Add Comment