'खुलभर दुधाची कहाणी' या पुस्तकाच्या लेखिका सुनंदा अमरापूरकर यांच्याशी संवाद

पुस्तक आणि लेखक : 38 मिनिटांचा व्हिडिओ

सुनंदा अमरापूरकर यांची ओळख दुहेरी सांगता येईल. मराठी ग्रंथ व्यवहाराशी परिचित असलेल्या लेखक-वाचकांना, दोन डझनांहून अधिक पुस्तकांच्या अनुवादक म्हणून त्यांची ओळख असेल. तर नाटक-सिनेमा क्षेत्राशी परिचित असलेल्या रसिकांना त्यांची ओळख, नाट्य-सिनेअभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची पत्नी अशी असेल. या दोन्ही भूमिका आणि आणखी बरेच काही सांगणारे आत्मकथन सुनंदाताईंनी लिहिले आहे, मेहता प्रकाशन पुणे यांनी ते नुकतेच प्रकाशित केले आहे.

त्या पुस्तकाच्या निमित्ताने यशोदा वाकणकर यांनी घेतलेली ही मुलाखत आहे. यशोदा ही अनिल अवचट यांची कन्या. अवचट व अमरापूरकर या दोन कुटुंबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध मागील तीन दशकांहून अधिक काळ राहिले आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ मुलाखत 'हार्ट टू हार्ट' अशी झाली आहे. या मुलाखतीची लिंक आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks

- संपादक, साधना

Tags: sunanda amarapurkar sadashiv amarapurkar mehta publishing house marathi books interviews yashoda vakankar anil awchat sadhana media center pustak ani lekhak Load More Tags

Add Comment