सातशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले हबशी किंवा सिद्दी समाजातील लोक भारताच्या पूर्व व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील काही ठिकाणी उतरवले गेले. त्यातील काही लोक महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागांत स्थायिक झाले. त्यांचा इतिहास, त्यांचे वर्तमान आणि त्यांची स्थिती-गती यांचा अभ्यास करण्याची इच्छा प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव-बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग या पाच तरुणांनी व्यक्त केली. त्यासाठी साधना ट्रस्टने त्यांना फेलोशिप दिली. मग त्यांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष त्या भागात दोन वेळा भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले लेख आणि व्हिडिओ असा हा दीर्घ रिपोर्ताज सादर करीत आहोत, 1 ते 15 मे 2022 या काळात. त्यातील हा दुसरा व्हिडिओ.
आफ्रिका खंडातून भारतात गुलाम म्हणून आणल्यापासूनचा शेकडो वर्षांचा काळ सिद्दींना हलाखीचे जीवन जगण्यातच घालवावा लागला. या देशात आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय आहे, या भावनेतून अनेक दशके संघर्ष केल्यानंतर अखेर सन 2003 मध्ये सिद्दींचा अधिकृतपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये समावेश करण्यात आला. यानंतर सिद्दींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली. सिद्दींचा एस.टी.मध्ये समावेश करण्यात त्यांच्या संस्कृतीमधील ‘दम्माम’ या पारंपरिक लोककलेने महत्त्वाची भूमिका बजावली. सिद्दींच्या जीवनात ‘दम्माम’ला अनन्यसाधारण महत्त्व होतेच, मात्र आरक्षणामुळे ते आणखी वाढले. भारतीय सिद्दींच्या आफ्रिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारे दम्माम म्हणजे काय, त्याचे सिद्दींच्या जीवनातील स्थान व महत्त्व या सगळ्याविषयीचा हा 10 मिनिटांचा व्हिडिओ..
उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज या दीर्घ रिपोर्ताज मधील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...
1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशिपच्या रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात-आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत.
वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 'साधना ट्रस्ट'च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल. (साधनाकडे 80 G आहे), नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना कळवले जातील.
धन्यवाद!
विनोद शिरसाठ, संपादक, साधना
weeklysadhana@gmail.com
Mob 9850257724
प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com
Mob : 97302 62119
Tags: सिद्दी समाज आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज Load More Tags
Add Comment